Ayodhya verdict: शांतता भंग करण्याचा प्रयत्न, धुळ्यात पहिला गुन्हा दाखल

अयोध्या येथील विवादित जागेप्रकरणी समाजात तेढ निर्माण होणार नाही, शांतता अबाधित राहावी यासाठी पोलिसांसह नागरिक देखील प्रयत्न करत असताना धुळ्यात या शांततेला गालबोट लावण्याचा प्रयत्न झाला आहे. शांतता भंग केल्याप्रकरणी धुळ्यात दोघांना अटक करण्यात आले आहे.

धुळे शहरातील जुन्या आग्रा रोडवरील काही दुकानांच्या भिंतीवर राजेंद्र मराठे ऊर्फ राजू महाराज याने ऑइल पेंटने जय श्रीराम असे लिहित शांतता भंग करण्याचा प्रयत्न केला. दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला म्हणून धुळे शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला. या प्रकरणी राजेंद्र मराठेला अटक करण्यात आली आहे. तसेच धुळ्यातीलच गोरक्षक संजय शर्मा याने स्वतःच्या फेसबुक अकाऊंटवरून वादग्रस्त पोस्ट केल्यामुळे त्याच्याविरोधात आझाद नगर पोलिसात गुन्हा दाखल होऊन त्याला अटक करण्यात आली आहे.

धुळे पोलिसांनी नागरिकांना अफवा पसरवू नये, समाज माध्यमातून कुठल्याही जाती, धर्माविषयी आक्षेपार्ह टिपण्णी, व्हिडीओ, संदेश पोस्ट करू नये असं आवाहन केलं आहे. दरम्यान, धुळे जिल्ह्यात 20 नोव्हेंबरपर्यंत कलम 144(1)(3) लागू करण्यात आलं आहे.

Loading...

महत्वाच्या बातम्या

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.