InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

‘ठाकरे’ सिनेमाचे आणखी दोन भाग येणार; संजय राऊत यांची मोठी घोषणा

शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारित ठाकरे हा सिनेमा आज रिलीज झाला आहे. या सिनेमाला महाराष्ट्रभरातून चांगला प्रतिसादही मिळाला आहे. यानंतर आता या सिनेमाचे निर्माते आणि शिवसेना नेते संजय राऊत यांनी एक मोठी घोषणा केली आहे. या सिनेमाचे आणखी दोन भाग येणार असल्याची माहिती राऊत यांनी दिली आहे.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आयुष्यावर आधारित असलेला ठाकरे हा सिनेमा आज रिलीज झाला आहे. अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी हा या सिनेमात बाळासाहेबांच्या भूमिकेत आहे. तर अभिनेत्री अमृता राव हिने बाळासाहेबांच्या पत्नी मीनाताई ठाकरेंची भूमिका साकारली आहे.

मुंबईतील वडाळामधील आयमॅक्स थिएटरमध्ये ठाकरे चित्रपटाचा फर्स्ट डे फर्स्ट शो आज पहाटे पार पडला. यासाठी दिग्दर्शक अभिजीत पानसेही उपस्थित होते. पहिल्या शोवेळी ढोलताशाच्या गजरात प्रेक्षकांचं स्वागत करण्यात आलं.

महत्वाच्या बातम्या –

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.