InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

काळवीटाची शिकार प्रकरणी दोघांना औरंगाबादेत अटक

वन्य प्राण्यांच्या शिकारीवर बंदी असताना आणि प्राणी वाचविण्याची मोहिम राबवली जात असतानाच औरंगाबादमधून एक धक्कादायक बातमी उघड झाली आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील हनुमंतगाव येथे चक्क ‘काळवीट’ची शिकार करून पार्टी करण्यात आली असल्याचं स्पष्ट झालं आहे. या पार्टीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले असून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. ही पार्टी करणाऱ्यांना अटक करून कारवाई करा अशी मागणी होत होती. अशातच त्यांना अटक करण्यात आली आहे.

औरंगाबाद जिल्ह्यातील हनुमंतगाव शिवारातली ही घटना आहे. ‘काळवीट’चं एक पिल्लू शेतात आलं असताना काही युवकांनी पकडून त्याची हत्या केली आणि नंतर त्याचं मटण शिजवून पार्टी केली. त्या काळवीटाला शेतातल्या झोपडीमध्ये आणताना आणि कापतानाचे ते फोटो आहेत.

महत्वाच्या बातम्या –

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply