InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

दिल्लीत महिलेवर झाडल्या दोन गोळ्या

देशाची राजधानी दिल्‍लीत गुन्‍हेगारीचे प्रस्‍त वाढत आहे. टवाळखोर खुलेआम फिरत आहेत. त्‍यांना पोलिसांची भीती उरलेली नाही. गुरुवारी (ता.११ ) सकाळी अशाच काही टवाळखोरांनी चारचाकीतील एक महिलेवर गोळीबार केल्‍याची घटना घडली. या गोळीबारात या महिलेस दोन गोळ्‍या लागल्‍याची माहिती मिळाली आहे.

दिल्‍लीतील द्वारका सेक्टर १२ मध्‍ये हा प्रकार घडला आहे. मिळालेल्‍या माहितीनुसार , द्वारका सेक्टर १२ मध्‍ये राहणारी किरणा बाला ही महिला तिच्‍या चारचाकीमधून जात होती. ती सेक्‍टर १३ च्‍या गोलचक्‍करजवळ पोहोचताच पाठीमागून  आलेल्‍या दुचाकीस्‍वार हल्‍लेखोरांनी तिच्‍यावर गोळीबार केला. एक गोळी चारचाकीच्‍या काचेतून आत जावून महिलेच्‍या गळ्‍याला लागली. यानंतर हे हल्‍लेखोर फरार झाले.

या घडलेल्‍या प्रकारानंतर पोलिस ताबडतोब घटनास्‍थळावर पोहोचले. पोलिसांनी जखमी अवस्‍थेतील या महिलेस उपचारासाठी रुग्‍णालयात दाखल केले. या हल्‍ल्‍यात महिला गंभीर जखमी आहे. पोलिस घटनेचा अधीक तपास करत आहेत.

महत्वाच्या बातम्या-

Get real time updates directly on you device, subscribe now.

Leave a Reply