यू मुंबाने तेलुगू टायटन्सचा ३१-२५ केला ने पराभव

यू मुंबाने तेलुगू टायटन्सचा पराभव करत विजयी सुरुवात केली. यू मुंबाने तेलुगू टायटन्सचा ३१-२५ ने पराभव केला तर बेंगळुरू बुल्सने पटना पायरेट्सचा ३४-३२ने पराभव केला आहे.

हैदराबादच्या गाचीबावली इनडोअर स्टेडियमवर प्रो-कबड्डीचा थरार रंगला. मुंबईसाठी कर्णधार फजल अत्राचलीने चार टॅकल तर संदीप नरवालने चार टॅकल गुण मिळविले. तसेच अभिषेक सिंहने पहिल्या सुपर १० गुणांची कमाई केली. पहिल्या हाफनंतर दुसऱ्या सीजनमध्ये चॅम्पियन टीम यू मुंबाने सात गुणांची आघाडी घेतली होती. मुंबाने सुरुवातीपासूनच तेलुगू टायटन्सच्या सिद्धार्थ देसाईला टार्गेट करत पहिल्या हाफमध्ये त्याला चारवेळा बाद केलं. सामन्याच्या १२ व्या मिनिटात मुंबईने टायटन्सला ऑलआऊट केलं. यू-मुंबाकडून अभिषेक सिंहने उत्तम कामगिरी केली. यावेळी संदीप नरवाल आणि कर्णधार फजल अत्राचलीचा दबदबाही पाह्यला मिळाला.

महत्वाच्या बातम्या –

Loading...
महत्वाच्या बातम्या
Loading...

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.