Uchai Trailer | मैत्रीची अनोखी व्याख्या सांगणाऱ्या ‘ऊंचाई’ चित्रपटाचा ट्रेलर रिलीज

मुंबई: अमिताभ बच्चन, अनुपम खेर आणि बोमन इराणी यांच्या बहुप्रतिक्षित चित्रपट ऊंचाई (Uchai) चा आज ट्रेलर रिलीज झाला आहे. ऊंचाई चे पोस्टर रिलीज झाल्यापासून चाहते या चित्रपटाच्या ट्रेलरची वाट बघत होते. चाहत्यांची  ही प्रतीक्षा संपलेली असून या पिक्चरचा ट्रेलर हृदयाला स्पर्श करून जात आहे. मुंबईमध्ये एका शानदार कार्यक्रमात या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. मैत्रीवर आधारित आलेल्या या चित्रपटाच्या ट्रेलरला चाहत्यांकडून खूप प्रशंसा मिळत आहे.

Uchai ट्रेलर रिलीज 

मुंबईमध्ये एका शानदार कार्यक्रमात ऊंचाई या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्यात आलेला आहे. 2 मिनिटे 50 सेकंदाच्या या चित्रपटाच्या ट्रेलर ने प्रेक्षकांना भावून करून टाकले आहे. कारण हा चित्रपट मैत्रीवर आधारित असून या चित्रपटांमध्ये अमिताभ बच्चन, अनुपम खेर, बोमन इराणी आणि डॅनी यांची अनोखी मैत्री दाखवली आहे. या चित्रपटामध्ये डॅनीच्या मृत्यूनंतर आपल्या मित्राची अपूर्ण इच्छा पूर्ण करायला निघालेल्या अमिताभ बच्चन, अनुपम खेर आणि बोमन इराणी यांची ही कहाणी आहे. आपल्या स्वर्गवासी मित्राची इच्छा पूर्ण करण्यासाठी हे तिघे जगातील सर्वोच्च शिखर एव्हरेस्ट बेसच्या ट्रेकला निघतात. या ट्रेकच्या दरम्यान परिणीती चोपडा ही त्यांची ट्रेक गाईड दाखवली आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून लोकांना आणखी एक अनोख्या मैत्रीची कथा बघायला मिळणार आहे. ट्रेलर मध्ये दाखवल्याप्रमाणे या चित्रपटांमध्ये कॉमेडी, प्रेम, विनोद आणि मैत्री या सर्व भावना दिसणार आहेत.

या चित्रपटाची रिलीज डेट

अमिताभ बच्चन, अनुपम खेर आणि बोमन विराणी यांच्या बहुप्रतिक्षित ऊंचाई चित्रपटाचा आज ट्रेलर रिलीज झाला आहे. ट्रेलर बघितल्यानंतर चित्रपटाबद्दलची उत्सुकताच चाहत्यांमध्ये अजूनच वाढले आहे. चाहत्यांची ही प्रतीक्षा लवकरच संपणार असून हा चित्रपट 11 नोव्हेंबर 2022 रोजी चित्रपटगृहांमध्ये चाहत्यांच्या भेटीस येणार आहे.

ऊंचाई चित्रपटातील इतर कलाकार

ऊंचाई या चित्रपटांमध्ये अमिताभ बच्चन, अनुपम खेर, बोमन इराणी आणि डॅनी मुख्य भूमिकेत दिसणार आहे. त्याचबरोबर या चित्रपटांमध्ये परिणीती चोपडा हीची महत्त्वाची भूमिका दिसणार आहे. ऊंचाई या चित्रपटामध्ये निना गुप्ता, नफिसा अली, आणि सारिका यासुद्धा महत्त्वाच्या भूमिका पार पाडणार आहे.

महत्वाच्या बातम्या 

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.