Uday Samant | “गुवाहाटीहून परत येताना आमच्यासोबत…”; उदय सामंतांच्या दाव्याने ठाकरे गटाची चिंता वाढली

Uday Samant |  मुंबई : एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडामुळे शिवसेनेतच दोन गट निर्माण झाले. शिंदे विरुद्ध ठाकरे गटात सुरु झालेली आरोप प्रत्यारोपाची मालिका काही केल्या थांबायचं नाव घेत नाहीये. तर दुसरीकडे सत्त्ताधारी विरुद्ध विरोधीपक्ष असा कलगीतुरा रंगलेला पाहायला मिळत आहे. ठाकरे गटाकडून शिंदे गटाला गद्दार म्हणवत पाठीत खंजीर खुपसल्याचा आरोप केला जातोय. अशातच आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आपल्या मंत्री आणि समर्थक आमदारांसह आज गुवाहाटी साठी रवाना झाले आहेत.

गुवाहाटी महाराष्ट्रातील राजकीय भुकंपाचे केंद्र बिंदू मानले जात आहे. तेथील प्रसिद्ध कामाख्या देवी मंदिरात ते विशेष पूजाविधी करणार आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एक विशेष विमान 200 सदस्यीय शिष्टमंडळ घेऊन मुंबईहून गुवाहाटीला रवाना झाले आहे. शिंदे आणि त्यांचे सहकारी रविवारी मुंबईत परतण्याची शक्यता आहे.

शिंदे गटातील ६ आमदारांनी या दौऱ्याला दांडी मारल्यामुळे राजकीय वर्तुळात याची चर्चा रंगली आहे. या पार्श्वभूमीवर उदय सामंत (Uday Samant) यांनी गुवाहाटीला रवाना होण्यापूर्वी विमानतळावर माध्यमांशी बोलताना मोठा दावा केला आहे. “चर्चा काहीही असो, आम्ही सगळे एकसंघ आहोत. येताना कदाचित आमच्यासोबत जास्त लोक असतील”, असं उदय सामंत म्हणाले आहेत. उदय सामंत यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे ठाकरे गटातून अजून काही लोक शिंदे गटात जाण्याची चर्चा सुरू झाली आहे.

महत्वाच्या बातम्या :

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.