Uday Samant | ठाकरे गटाकडून माझ्यावर हल्ल्याचा प्रयत्न; उदय सामंत यांचा गंभीर आरोप

Uday Samant | मुंबई: सध्या मुंबईतील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. शाखा पडताना बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या फोटोवर हातोडा मारल्याचा आरोप ठाकरे गटाकडून करण्यात आला होता. याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी मनपा अधिकाऱ्याला मारहाण केली होती. या प्रकरणावरून राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी ठाकरे गटावर गंभीर आरोप केला आहे.

The Thackeray group tried to attack me – Uday Samant

ठाकरे गटाकडून माझ्यावरही हल्ल्याचा प्रयत्न झाला असल्याचं उदय सामंत म्हणाले आहे. उदय सामंत म्हणाले, “11 महिन्यापूर्वी निर्णय घेतल्यावर माझ्यासारख्या कार्यकर्त्यावर तीनदा हल्ला झाला होता. एकदा तर पुण्यामध्ये लोकांनी माझ्यावर समोरून हल्ला केला. त्यानंतर दुसरा हल्ला छत्रपती संभाजीनगर येथे करण्यात आला.”

पुढे बोलताना ते म्हणाले, “ठाकरे गटानं माझ्यावर अनेकदा हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र, माझ्यासारखे कार्यकर्ते अशांना अजिबात घाबरत नाही. तर उलट आम्ही अजून हिंमतीने उभे राहतो.”

दरम्यान, उदय सामंत यांच्या या वक्तव्यानंतर शिंदे गट आणि  ठाकरे गट यांच्यात नवा वाद निर्माण होण्याची शक्यता झाली आहे. उदय सामंत यांच्या या वक्तव्यावर ठाकरे गटाकडून काय प्रतिक्रिया येतील? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

महत्वाच्या बातम्या

Original NEWS SOURCE – https://bit.ly/3r9o75s

You might also like

Comments are closed.