Uday Samant | नोटाला दुसऱ्या क्रमांकाची मतं मिळण्यामागे भाजपाचं षडयंत्र ?; उदय सामंत म्हणाले…

Uday Samant | मुंबई : संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष ज्या निवडणुकांवर होतं त्या अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीचा निकाल अखेर लागला आहे. यामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने लढणाऱ्या ऋतुजा लटके (Rutuja Latke) या विजयी झाल्या आहेत. या निवडणुकीमध्ये एकूण सात उमेदवार होते. ऋतुजा लटके (Rutuja Latke) यांना जवळपास 60 हजार पेक्षा जास्त नागरिकांनी मतदान केलंय. पण जवळपास साडे 12 हजार पेक्षा जास्त नागरिकांनी नोटाचं बटन दाबत आपलं रोखठोक मत मांडलं आहे.

विशेष म्हणजे या निवडणुकीत फक्त 31.74 टक्के नागरिकांनी मतदान केलं होतं. त्यापैकी साडेबारा हजार नागरिकांनी नोटाचं बटन दाबून मतदान केल्याने याबाबतची सध्या जोरदार चर्चा आहे. भाजपाची मतं ही नोटाला गेली असल्याचा दावा विरोधकांकडून करण्यात येत आहे. यावर मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी उत्तर दिलंय.

ते म्हणाले, “मला वाटतं प्रत्येक पक्षाने आत्मपरिक्षण करण्याची गरज आहे. दोन महत्त्वाच्या गोष्टी आहेत. निवडणुकीचं मतदान कमी का झालं याचं आम्ही आत्मचिंतन केलं पाहिजे आणि नोटाला मतं का पडली याचंही आत्मचिंतन केलं पाहिजे.” आम्हाला सर्वांना समाधान आहे की आमचे सहकारी रमेश लटके जे आज आमच्यात नाहीत. त्यांच्या पत्नी ऋतुजा लटके फार मोठ्या मताधिक्याने निवडून येत आहेत. त्याबद्दल आम्हाला सर्वांनाच समाधान आहे. त्या निवडून आल्यावर आम्ही सगळेच अभिनंदन करू. मी आत्ताच अभिनंदन करून ठेवतो”, असंही उदय सामंत (Uday Samant) म्हणाले.

दरम्यान, काही लोकं नोटाला मतं मिळाली याला भाजपाला जबाबदार धरत आहेत, हे योग्य आहे असं मला वाटत नाही. प्रचारात लोक नोटाला मतदान करणार आहेत असं जाणवलं असेल, त्यामुळे हे खापर भाजपावर फोडण्याचा प्रयत्न झाला असावा. सगळ्यांनीच नोटाला इतकं मतदान का झालं याचं आत्मचिंतन आणि आत्मपरिक्षण करण्याची गरज आहे, असं म्हणत त्यांनी विरोधकांना टोला लगावला.

महत्वाच्या बातम्या :

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.