Uday Samant | “मी कुठंतरी वाचलंय रेडा हे…”, उदय सामंत संतापले

Uday Samant | मुंबई : काही जण ४० रेडे घेऊन गुवाहाटीला गेले आहेत. त्यांना रेडे मी म्हटलेलं नाही. त्यांच्याच मंत्रीमंडळातील एका मंत्र्याने आमचे ४० रेडे तिकडे गेल्याचं म्हटलं होतं, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी शनिवारी बुलढाण्यात केली होती. यावर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटाचे नेते उदय सामंत (Uday Samant) यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख  उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना प्रत्युत्तर दिलं आहे.

यावेळी, त्यांनी एक ट्विट केलं आहे. पाच महिन्यापूर्वी आम्ही चाळीस आमदार “वाघ” होतो.. आम्ही उठाव केला मा. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले.. त्यानंतर आम्ही “रेडा” झालॊ.. किती ती चिडचिड.. “मी कुठंतरी वाचलंय रेडा हे यमाच वाहन आहे”, असं त्यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, काही जण ४० रेडे घेऊन गुवाहाटीला गेले आहेत. त्यांना रेडे मी म्हटलेलं नाही. त्यांच्याच मंत्रीमंडळातील एका मंत्र्याने आमचे ४० रेडे तिकडे गेल्याचं म्हटलं होतं. “तुम्हा सर्वांच्या साक्षीने या ४० रेड्यांनी, गद्दारांनी त्यांच्यात मर्दानगी शिल्लक असेल, तर जाहीर सांगावं की, ते भाजपाच्या तिकीटावर निवडणूक लढणार नाही, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली होती.

तसेच, हे सरकार आश्वासनांची खैरात करणारं आहे, पण प्रत्यक्षात कोणाच्याच पदरात काहीच पडणार नसल्याचे, सांगायला ते विसरले नसल्याचं ठाकरे म्हणाले. तसेच, गेल्या आठवड्यात मुख्यमंत्री स्वतःचा हात दाखवायला गेले होते. आज ते कामाख्या देवीचा नवस फेडायला गेले आहेत. ज्यांना स्वतःचे भविष्य माहित नाही, ते आपलं काय भविष्य ठरविणार, असा घणाघात उद्धव ठाकरे यांनी केला आहे.

महत्वाच्या बातम्या :

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.