Uday Samant | …म्हणून महाविकास आघाडी पुन्हा कधीही सत्तेत येणार नाही – उदय सामंत

Uday Samant | मुंबई : आगामी लोकसभा , विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीने चांगलीच कंबर कसली आहे. महाविकास आघाडीतील जेष्ठ नेत्यांकडून देखील 2024 मध्ये महाविकास आघाडी एकत्र असणार असं सांगितलं जातं आहे. परंतु जागावाटपाबाबत अजूनही मतभेद पाहायला मिळत असून मविआच्या नेत्यांकडून याबाबत प्रतिक्रिया देखील दिल्या जात आहे. दरम्यान, आता मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी महाविकास आघाडीबाबत मोठं वक्तव्य केलं असून खासदार संजय राऊत ( Sanjay Raut) यांच्यावर निशाणा साधला आहे.

महाविकास आघाडी सत्तेत येणार नाही : उदय सामंत

उद्या सामंत ( Uday Samant) म्हणाले की, मी 2024 मध्ये राष्ट्रीवादी काँग्रेस ( NCP) पक्षातून बाहेर पडलो. यामुळे या पक्षावर जास्त काही बोलणार नाही. परंतु आता “दोन दिवसांपूर्वी ग्रामीण भागात ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुका झाल्या आहे त्यावरून सिद्ध झालं आहे की भाजप ( BJP) पहिल्या क्रमांकावर आहे. शिवसेना दुसऱ्या क्रमांक, राष्ट्रवादी काँग्रस तिसऱ्या क्रमांकावर, काँग्रेस चौथ्या तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष पाचव्या क्रमांकावर पाहायला मिळाली. म्हणून महाविकास आघाडी यापुढे सत्तेवर येणार नाही”. असं उद्या सामंत यांनी वक्तव्य केलं आहे. याचप्रमाणे जोपर्यंत सकाळी 9 वाजता टीव्ही येऊन काहीही बडबडत करणारे पक्षात आहेत तोपर्यंत तरी महाविकास आघाडी जिंकणार नाही. असा टोला देखील संजय राऊतांना ( Sanjay Raut) लगावला आहे.

Uday Samant Commented On Sanjay Raut

दरम्यान, आता झालेल्या कृषी उत्पन्न समितीत भाजपला आणि शिवसेना यांना ४५ टक्के जागा मिळाल्या आहेत. यावरून लक्षात आलं असेल की, सामनाच्या अग्रलेखात काहीही लिहिलं तरीही त्याचा फायदा महाविकास आघाडीला होत नाही. काही लोक रोज सकाळी बडबड करतात त्याची न्युज बनते परंतु, अशा लोकांकडे कोणीही लक्ष देत नाही. त्याची लोकांना सवय झाली आहे. अशा शब्दांत संजय राऊतांवर ( Sanjay Raut) उदय सामंत (Uday Samant) यांनी निशाणा साधला आहे.

महत्वाच्या बातम्या-

Original NEWS SOURCE – https://bit.ly/43qZy24

You might also like

Comments are closed.