Uday Samant | सर्वोच्च न्यायालयचा निकाल आमच्या बाजूनेच असेल – उदय सामंत

मुंबई : शिंदे गटातील आमदारांच्या अपात्रतेच्या वादावरील सुनावणीसंदर्भात प्रतिक्रिया देताना शिंदे गटाचे आमदार उदय सामंत यांनी निकाल आमच्याच बाजूने लागेल असा विश्वास व्यक्त केलाय. पत्रकारांशी संवाद साधताना सामंत यांनी आमची बाजू वकील हरिश साळवे यांनी अगदी योग्य पद्धतीने मांडल्याचं नमूद केलं आहे. इतकच नाही तर आम्ही सुरुवातीपासूनच हे प्रकरण पक्षांतर कायद्या अंतर्गत येत नसल्याचं आम्ही म्हणत होतो असंही सामंत म्हणालेत. आमचे वकील साळवे यांनी जी भूमिका मांडलीय ती महत्वाची आहे.

आम्ही पहिल्या दिवसापासून सांगतोय की आम्ही शिवसेना सोडून कुठेही गेलेलो नाही. आम्ही शिवसेनेतच आहोत. आम्ही पक्षांतर्गत आवाज उठवला आहे. हे असं करणं पक्षांतरण कायद्याअंतर्गत येत नाही,” असं सामंत यांनी स्पष्ट केलं. तसेच आमची भूमिका वकील हरीश साळवे यांनी मांडल्याचंही सामंत म्हणाले. “आम्ही शिवसेना सोडली नाही तर पक्षांतरण कायदा लागू होणार नाही ही आमची भूमिका योग्य प्रकारे आमच्या वकिलांनी न्यायालयात मांडली असून त्याच्याशी आम्ही सहमत आहोत,” असं सामंत यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं.

महत्वाच्या बातम्या :

महत्वाच्या बातम्या

Comments are closed.