Uday Samant | “C-295 प्रकल्प वर्षभरापूर्वीच…”; उदय सामंत यांचे स्पष्टीकरण
Uday Samant |मुंबई : वेदांता-फॉक्सकॉन (Vedant Foxcon) प्रकल्पनंतर नागपूरमध्ये होणारा C- 295 लष्करी ट्रान्सफोर्ट एअरक्राफ्ट प्रकल्प आता गुजरातमधील वडोदऱ्याला होणार आहे. त्यामुळे राज्यात खळबळ उडाली आहे. अशातच राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी C- 295 लष्करी ट्रान्सफोर्ट एअरक्राफ्ट प्रकल्पाबद्दल एक मोठं वक्तव्य केलं आहे.
काय म्हणाले उदय सामंत (Uday Samant)
नागपूरमध्ये येणारा C- 295 लष्करी ट्रान्सफोर्ट एअरक्राफ्ट प्रकल्प वर्षभरापूर्वीच गुजरातला नेण्याचा निर्णय झाला असल्याची माहिती उदय सामंत यांनी दिली आहे. उदय सामंत यांनी एका वृत्तवाहिनीशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते.
युवासेना नेते आदित्य ठाकरे यांनी केलेले आरोप मी समजू शकतो. कारण विरोधक म्हणून हे आरोप आम्हाला देखील अपेक्षित आहेत. पण त्या आरोपांमुळे युवा पिढीत संभ्रम निर्माण करु नये, अशी माझी विनंती आहे. कारण या प्रकल्पाबाबत मी एका मुलाखतीत नक्कीच उल्लेख केला होता की हा प्रकल्प महाराष्ट्रात आणण्याचा आम्ही नक्कीच प्रयत्न करु. पण त्यानंतर माहिती घेतल्यानंतर लक्षात आलं की 21 सप्टेंबर 2021 रोजीच या प्रक्लपाचा एमओयू झालेला होता. म्हणजेच वर्षभरापूर्वीच हा प्रकल्प महाराष्ट्रात येणार नाही हे निश्चित झालेलं होतं. याची कागदपत्रेही आपल्याला बघायला मिळतील.
आपल्या युवा पिढीचं दुर्देवं असं आहे की, एक वर्षापूर्वी एमओयू झाला, पण तो प्रकल्प आमच्याकडे यावा यासाठी साधं एक पत्रही गेल्या सरकारकडून केंद्र सरकारकडे गेलं नाही, अशी माझ्याकडे प्राथमिक माहिती आहे. पुढे बोलताना सामंत यांनी सांगितले की, एक वर्षापूर्वी ज्या प्रकल्पाचा एमओयू झालाय, थोडेफार संकेत असे आहेत की, ज्या प्रकल्पाचा एमओयू झालाय त्याची जागादेखील ठरली आहे. म्हणून मी ज्यावेळी सांगितलं की या प्रकल्पासाठी प्रयत्न करतोय. पण मी ज्यावेळी माहिती घेतली त्यावेळी असं लक्षात आलं की, याबाबत कुठेही पत्रव्यव्हार झालेला नाही. आरोप-प्रत्यारोप करण्यामध्ये काही अर्थ नाही. वेदांताच्या बाबतही हेच झालं. आठ महिन्यांमध्ये हाय पावर कमिटी कुणी लाऊ शकलं नाही.
महत्वाच्या बातम्या :
- Breaking News | महाराष्ट्रात होणारा आणखी एक प्रकल्प गुजरातला, 22 हजार कोटींचा C-295 प्रकल्प वडोदऱ्यात
- Uddhav Thackeray | अब्दुल सत्तारांच्या ‘दारू पिता का?’ प्रश्नावरून ठाकरे गटाची सत्तारांवर टीका, म्हणाले…
- Abdul Sattar | पीक पाहणी दौऱ्यादरम्यान अब्दुल सत्तारांनी जिल्हाधिकाऱ्यांना विचारलं, “दारू पिता का?”
- MNS । नोटेवरील बापूंच्या फोटोवरून राजकारण तापलं ; मनसेने मांडली भूमिका
- Big Boss Marathi | बिग बॉस मराठी 4 मध्ये अमृता फडणवीसांची एन्ट्री
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.