महाविद्यालये सुरु करण्याबाबत उदय सामंतांचा मोठा निर्णय!

जालना : कोरोना आटोक्यात आल्यानं येत्या 15 सप्टेंबरपासून महाविद्यालयीन शैक्षणिक वर्ष सुरू करण्याचा प्रयत्न करीत आहोत, असं उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी सांगितलं होतं. मात्र, डेल्डा प्लस व्हारियंटमुळे राज्यात पुन्हा निर्बंध लावण्यात असून यासंबंधी उदय सामंत यांनी महत्वाची घोषणा केली आहे.

लसीकरण प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत महाविद्यालये सुरु करणे शक्य नाही, असं उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी सांगितलं आहे. कोरोनाच्या संसर्गामुळे यंदाही शाळा आणि महाविद्यालये ऑनलाईन पद्धतीने सुरू ठेवण्यात आली आहेत. आता कोरोना रूग्णसंख्या कमी झाल्यानं महाविद्यालये सुरू करा, अशी मागणी करण्यात येत होती. मात्र लसीकरण प्रकिया अद्याप पुर्ण झाली नसल्यानं महाविद्यालयांची कुलूपं सध्यातरी बंदच राहणार असल्याचे सांगितले जात आहे.

आगामी शैक्षणिक वर्षात म्हणजेच 2021-22 या शैक्षणिक वर्षात शासकीय इंजिनीयरिंग महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना फी व्यतिरिक्त असलेल्या इतर शुल्कामध्ये 16 हजार 250 म्हणजेच अंदाजे 25 टक्के सूट देण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा