‘एक कानाखाली द्यावी’; उदयनराजे राष्ट्रवादी काँग्रेसवर संतापले

विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात झाली असून सर्वच राजकीय पक्षांकडून प्रचारसभांचा धडाका लागला आहे. साताऱ्यातील पाटण विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार शंभूराज देसाई यांच्या प्रचारासाठी एका जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. या सभेसाठी शिवसेना युवानेते , यांनी उपस्थिती लावली होती. जाहीर सभेत भाषण करताना हे झाल्याचं दिसून आलं.

“गेल्या 30-40 वर्षांचा काळ पाहिला तर त्यावेळी शंभूराज आमदार नव्हते आम्ही तर कॉलेजमध्ये होतो. भाजप-शिवसेनेचा एकही खासदार तर सोडा आमदार या पश्चिम महाराष्ट्रात नव्हता. सर्व आमदार, खासदार काँग्रेसचे आणि नंतर राष्ट्रवादीचे झाले. मात्र, ही जबाबदारी त्यांची होती त्यांनी तुमच्या शेतात साधं पाणी सुद्धा दिलं नाही. मला आठवतय 1996 साली शिवसेना-भाजपचं सरकार होतं, त्यावेळी मुंडे साहेबांकडे गेलो आणि त्यांना वस्तूस्थिती सांगितली. त्यांनी कृष्णा खोरे प्रकल्पाची मुहूर्तमेढ रोवली. त्यामुळे आज संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रासाठी मोठं वरदान ठरली ही योजना. इतके लोकं तुमच्यावर प्रेम करतात, अनेक वर्षे निवडून देतात. तुम्ही कामं करणं तर लांबच राहीलं पण मला आठवतयं कॉलेज संपल्यावर साताऱ्याला प्रथम आलो त्यावेळी यांची भाषणं काय असायची. मला कळायचचं नाही की यांच्या डोक्यावर परिणाम झालाय की काय? कारण इतका अहंकार… ज्यांच्यामुळे तुम्ही इतकी वर्षे निवडून आलेत त्यांचा विसर, आठवण तुम्हाला पडली नाही. केवळ निवडणुका आल्या तर सांगायचं मतदान करा आणि ते सुद्धा रुबाबात. तुम्हाला सांगतो आदित्य तुम्ही त्यावेळी शाळेत असाल. भाषण काय असायची माहितेय.. किळस आणण्यासारखी भाषणं असायची. असं वाटतं की एक कानाखाली द्यावसं वाटतयं.”

 

महत्वाच्या बातम्या

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.