आपली स्टाईल इज स्टाईल, उदयनराजेंचे अजित पवारांना आव्हान; म्हणाले, तुमच्यात हिंमत असेल तर…

मुंबई : गेल्या आठवड्यात उपमुख्यमंत्री अजित पवार साताऱ्यातील माण तालुक्याच्या दौऱ्यावर होते. यावेळी एका कार्यक्रमानिमित्त अजित पवारांनी विकासकामांवरून उदयनराजेंना फटकारलं. साता-याच्या एमआयडीसीमधील खंडणीबाबत अजित पवारांनी नाव न घेता उदयनराजेंचा समाचार घेतला. तसेच एमआयडीसीत उद्योग का येत नाहीत? असा सवाल विचारत उदयनराजेंना फटकारलं.

पुढे या कार्यक्रमात भाषण करताना जिल्ह्यातील माण, खटाव आणि सातारा तालुक्यात खंडणीखाेरांचे प्रमाण वाढले आहे असे माझ्या कानावर सातत्याने येत आहे. अपप्रवृत्तींचा बंदाेबस्त करा अशी सूचना एसपींना केल्याचे मंत्री पवार यांनी नमूद केले. साता-याच्या एमआयडीसी मधील खंडणीबाबत मंत्री पवार यांनी त्यांच्या भाषणात काेणाचा ही विशेष उल्लेख न करता समाचार घेतला.

मात्र यानंतर आता अजित पवारांच्या या आरोपाला आता उदयनराजे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. ‘मी कुठल्या पक्षाच्या विरोधात बोलत नसून भ्रष्टाचाराच्या विरोधात उघडपणे बोलतो. जे कोण मला खंडणीखोर बोलतात त्यांनी समोरासमोर यावं. माझ्यात दम आहे, मी ईडीची चौकशी करायला तयार आहे. तुमच्यात हिंमत असेल तर ईडीच्या चौकशीला सामोरे जायला तयार राहा’ असं आव्हान उदयनराजे यांनी अजित पवारांना दिले.

तसेच पुढे तुम्ही लोकप्रतिनिधी आहेत की लोकलुटारे आहात ते ठरवा. हे लोक पदावरून जातात त्यावेळी कार्यालयातील कर्मचारीही त्यांना ओळख देत नाहीत. पण आपले तसे नाही, आपली स्टाईल इज स्टाईल, असे म्हणत त्यांनी कॉलर उडवत, अजित पवारांना आव्हान दिल आहे.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या
या बातमीवर तुमची कमेंट लिहा