InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

‘राजीनामा द्यायला जिगर लागतं’, उदयनराजेंची विरोधकांवर टीका

- Advertisement -

विधानसभा निवडणुकी सोबतच सातारा लोकसभा पोटनिव़डणूक होणार आहे. साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी खासदारकीचा राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या जागेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे. तर विधानसभेच्या पार्श्वभूमिवर कराडमधील भाजपाच्या विधानसभेच्या उमेदवारासाठी प्रचारसभा आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी उदयनराजे भोसले यांनी विरोधकांवर हल्ला चढवला. आपल्या राजीनम्यावर भाष्य करताना, राजीनामा देण्यासाठी जिगर लागतं, असं म्हणत विरोधकांवर निशाणा साधला.

- Advertisement -

मी कालही तुमचा होतो, आजही तुमचाच आहे आणि मरेस्तोवरही तुमचाच राहणार. मी राजीनाम्याची पर्वा करत नाही. राजीनामा देण्यासाठी जिगर लागतं,” असं उदयनराजे भोसले जनतेला संबोधित करताना म्हणाले. यावेळी त्यांनी कॉलर उडवण्यावर आक्षेप घेणाऱ्यांनाही धारेवर धरलं. मी घालतो ते माझं शर्ट, माझी कॉलर त्याचं मी काहीही करेन. ती मी उडवली तर मी बेशिस्त झालो, हा कोणता न्याय आहे, असा सवाल उदयनराजे यांनी यावेळी केला.

Loading...

Get real time updates directly on you device, subscribe now.

- Advertisement -

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.