Udayanraje Bhosale | “कसला तो थर्ड क्लास…”, उदयनराजे भोसले त्रिवेंदींवर संतापले

Udayanraje Bhosale | मुंबई : राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Bhagatsingh Koshyari) यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान केल्यानंतर भाजप पक्षाचे प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी (Sudhanshu Trivedi) यांनी देखील त्यांना साथ दिली. यावरुन उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांनी तीव्र संताप व्यक्त करत अतिशय कठोर शब्दात त्रिवेदी यांच्यावर घणाघात केला आहे.

कसला तो थर्ड क्लास भिकारडा. त्या त्रिवेदीला बाहेर काढा. नाही तर मी माझ्या पद्धतीने बघून घेईल, त्यांची जीभ कशी हासडायची हे मला माहीत आहे, असा संतप्त इसारा उदयनराजे यांनी दिला आहे.

प्रत्येक पक्ष छत्रपती शिवाजी महाराजांच नाव घेतल्याशिवाय स्वतःच्या समाजकार्याला, राजकीय वाटचालीला सुरुवात करत नाही. राज्यापालाच पद सन्मानाच पद आहे. त्यांना आपण काय बोलावं हे कळायला पाहिजे. त्यांनी एकदा नव्हे दोनदा विधान केलं, असं उदयनराजे म्हणाले.

महत्वाच्या बातम्या :

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.