Udayanraje Bhosale | “राज्यपालांना वेड्याच्या हॉस्पिटलमध्ये पाठवा”; उदयनराजे भोसले यांची सडकून टीका
हे वाद ताजे असतानाच राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagatsingh Koshyari) यांनी मराठवाडा विद्यापीठाच्या एका कार्यक्रमात बोलताना थेट छत्रपती शिवाजी महाराजांविषयी वादग्रस्त वक्तव्य केलं. यावरून भाजप खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांनी त्यांच्या वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतला आहे.
छत्रपती शिवाजी महाराज आणि इतर महापुरुषांच्या विरोधात वादग्रस्त विधान करणाऱ्या राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची पदावरून हकालपट्टी करून त्यांची रवानगी वृद्धाश्रमात किंव्हा वेड्याच्या हॉस्पिटलमध्ये करावी, अशा शब्दात सडकून टीका उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांनी केली आहे.
साताऱ्यात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून त्यांनी राज्यपालांना निर्वाणीचा इशारा दिला आहे. ” त्यांचं वय पाहता त्यांना वृद्धाश्रमात पाठवायला हवं. पण त्यांना वृद्धाश्रमात घेतील की नाही? याबाबत शंका आहे. कारण ते तिथेही काहीतरी वाद-विवाद निर्माण करतील. त्यामुळे त्यांची तेथूनही हकालपट्टी होईल”, असं उदयनराजे भोसले म्हणालेत.
पुढे ते म्हणाले, “वृद्धाश्रमाव्यतिरिक्त आता फक्त एकच ठिकाण उरतं, जिथे त्यांना पाठवता येऊ शकतं, ते म्हणजे वेड्यांचं रुग्णालय. कारण वेड्यांना तिथेच ठेवलं जातं. त्यांच्या विधानावरून त्यांना वेडेच म्हणावं लागेल. ‘उचलली जीभ लावली टाळ्याला’ या म्हणीप्रमाणे ते कुठेही काहीही बोलतात. त्यांना नेमकी मस्ती कशी आली? आणि त्यांच्या असं बोलण्याचं नेमकं कारण काय? हेच मला कळत नाही.”
महत्वाच्या बातम्या :
- Sanjay Raut | “…तर तुम्ही मूर्ख आणि खोटारडे आहात”; उद्धव ठाकरेंवरील ‘त्या’ आरोपावरून संजय राऊतांचा भाजपवर निशाणा
- Sam Bahadur Teaser | ‘या’ दिवशी रिलीज होणार विकी कौशलचा फिल्ड मार्शल सॅम माणेकशॉ बायोपिक
- Pak vs ENG | इंग्लंड संघातील खेळाडूंवरील संकट टळले, PBC ने दिली ‘ही’ मोठी माहिती
- TVS Launch | टीव्हीएस RTR Apache 160 4V स्पेशल एडिशन लाँच
- Pak vs ENG | “माझी इंग्रजी संपली…”; पत्रकाराने विचारलेल्या प्रश्नावर पाकिस्तानी गोलंदाजाने दिले उत्तर
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.