InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

VIDEO- ‘तुम्ही सातारच्या दोन राजांना खूप पळविले आहे’ – उदयनराजे

साताऱ्यात यशवंत हॉस्पिटलच्या उद्घाटनासाठी शरद पवार साताऱ्यात आले होते. दवाखान्याच्या उदघाटनप्रसंगी शरद पवार यांनी  उदयनराजे आणि शिवेंद्रराजे यांना सोबत घेऊन कार्यक्रमस्थळी आले. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी उदयनराजे आणि शिवेंद्रराजेंना घेऊन एकाच कारने प्रवास केला होता. शिवेंद्रराजे स्वतः गाडी चालवत होते. MH.11.1111 ही त्यांची गाडी शिवेंद्रराजे स्वत: चालवत होते तर शरद पवार यांच्या शेजारील सीट वर बसले होते. पाठीमागे उदयनराजे बसले होते. शरद पवारांनी दोघांना एका गाडीत बसवून मनोमीलन झाल्याचा संदेश दिला होता.

साताऱ्याच्या राजघराण्यातील मनोमिलनाची चर्चा सुरू असतानाच आज रविवार सकाळी दि. 27 रोजी खा. श्री. छ.उदयनराजे व आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले सातारा रनर्स फाउंडेशनच्या आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात एकत्र आले होते. त्यावेळी  उदयनराजे आणि शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी “व्हिक्टरी ” अशी निशाणी दाखवली. साताऱ्यात विजय हा आमचाच आहे, असे सूचित केले. यावेळी साताऱ्यातील रनर्स मोठ्या संख्येने उपस्थित होते. खासदार उदयनराजे भोसले यांची प्रसन्न मुद्रा सातारकरांना खूप काही सांगून गेली.

महाराज साहेब तुम्ही थोडी रन करा म्हटल्यावर उदयनराजे म्हणाले, तुम्ही आम्हाला दोघांना एवढे पळवले आहे. आता पळवू नका असा चिमटा काढल्यावर सगळीकडे एकच हशा पिकला. पाहा हा व्हिडिओ- 

भाजप पदाधिकाऱ्यांचा सामुहिक राजीनामा; भाजपला जोरदार धक्का

‘तुझं रडण ऐकलं की मला झोप लागत नाही’, शरद पवारांमध्ये दडलेला ‘बाप’माणूस

‘पॉवर’- शिवेंद्रराजेंच्या गाडीत उदयनराजे बसले! शिवेंद्रराजेंनी सारथ्य केलं

राष्ट्रवादीचे तीन ‘युवा रोहित’ माणदेशात एकत्र !

‘तुझं रडण ऐकलं की मला झोप लागत नाही’, शरद पवारांमध्ये दडलेला ‘बाप’माणूस

बाबासाहेब पुरंदरे यांना पद्मविभूषण म्हणजे जिजाऊ, छत्रपतींचा अपमान

‘पॉवर’- शिवेंद्रराजेंच्या गाडीत उदयनराजे बसले! शिवेंद्रराजेंनी सारथ्य केलं

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.