Uddhav Thackeray। “…त्याचवेळी उद्धव ठाकरे यांनी गेम केला” ; शिंदे गटातील आमदाराचा गौप्यस्फोट
बुलढाणा : गेली अनेक दिवसांपासून शिंदे गटातील आमदार संजय गायकवाड हे आपल्या वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत आले आहेत. शिंदे गटात दाखल होताच त्यांनी बुलढाण्यातील शिवसैनिकांना चून-चून के गीण-गीण के मारे जायेगे” अशी थेट धमकी दिली होती. अशातच त्यांनी आता उद्धव ठाकरे यांच्या बाबतीत एक खळबळजनक दावा केला आहे. उद्धव ठाकरे आणि शिवसेना यांचा काहीही संबंध नसल्याचं संजय गायकवाड म्हणाले आहेत.
बुलढाणा येथील छत्रपती शिवाजी महाराज मंदिराचे भूमिपूजन झाले यावेळी आमदार गायकवाड बोलत होते. पुढे ते म्हणाले, शिवसेनेशी संबंध होता तो राज ठाकरे यांचा. ज्यावेळी बाळासाहेबांचे बायपास झालं त्यावेळी ते एकाकी पडले होते. त्यामुळे उद्धव ठाकरे यांना वाटले की आपण राज्याचे नेतृत्व करावं. मात्र निवडणूक आयोगाला कार्याध्यक्ष निवडून द्यायचा होता. त्यावेळी सर्वात मोठी अडचण राज ठाकरेंची होती. त्याचवेळी प्लॅनिंग झालं असल्याचं गायकवाड म्हणाले.
“उद्धव ठाकरे यांनी मनोहर जोशींच्या खांद्यावर बंदूक ठेवली. त्यांच्या कानात सांगितले की, राज ठाकरे यांना सांगा की उद्धव ठाकरे यांना कार्याध्यक्ष करावं अशी इच्छा बाळासाहेबांची आहे. कारण राज ठाकरे बाळासाहेबांना क्रॉस करू शकत नाहीत.
यावेळी काहीही संबंध नसताना राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांचे नाव सुचवले ते कार्याध्यक्ष पदासाठी. त्याचवेळी उद्धव ठाकरे यांनी गेम केला तो राज ठाकरे यांचा”, अशा शब्दात आमदार संजय गायकवाड यांनी गौप्यस्फोट केलाय.
बुलढाण्यातील छत्रपती शिवाजी महाराज मंदिर भूमिपूजनचे भूमिपूजनावेळी आमदार गायकवाड भाषणात बोलत होते. यावेळी संजय गायकवाड यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवरही जोरदार टीका केली. अजितदादांना काय करायचे आहे मला फिरता येते का नाही यांच्याशी. आमचे काही झाले की लगेच अजित पवार शिवसेनेच्या बाजूने स्टेटमेंट करतात, पवारांनी त्यांच्या नावाची सुपारी घेतली का? असा सवाल आमदार संजय गायकवाड यांनी केला आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Health Care Tips | झपाट्याने वजन वाढायचे असू शकते ‘हे’ कारण
- Prakash Ambedkar । वंचित बहुजन आघाडी करणार ठाकरे गट आणि काँग्रेससोबत युती? ; प्रकाश आंबेडकर म्हणाले…
- Viral Video | माकडाने पाजले कुत्र्याच्या पिलांना आपले दूध, पाहा व्हिडिओ
- Eknath Shinde | एकनाथ शिंदे गटाच्या चिन्हावर देखील आक्षेप ; काय आहे प्रकरण?
- Breaking News । भाजप उमेदवार मुरजी पटेल यांच्या अर्जावर ठाकरे गटाचा आक्षेप, कारणही सांगितलं…
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.