Uddhav Thackeray | अब्दुल सत्तारांच्या ‘दारू पिता का?’ प्रश्नावरून ठाकरे गटाची सत्तारांवर टीका, म्हणाले…

Uddhav Thackeray | मुंबई : अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी शेतकऱ्यांच्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी बीड (Beed) जिल्ह्याचा दौरा केला. दौऱ्यावर असताना अब्दुल सत्तार, अर्जून खोतकर आणि काही अधिकारी चहा पिण्यासाठी बसले होते. तेव्हा जिल्हाधिकारी राधा बिनोद शर्मा यांनी ‘चहा कमी पितो,’ असं म्हटलं. त्यावर अब्दुल सत्तारांनी “दारू पिता का?”, असा प्रश्न विचारला. याच पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गटाच्या नेत्या मनीषा कायंदे (Manisha Kayande) यांनी अब्दुल सत्तारांवर टीका केली आहे.

उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गटाची अब्दुल सत्तारांवर टीका

महाराष्ट्राचे कृषीमंत्री बीड जिल्ह्यात पिकांचं नुकसान पाहण्यासाठी गेले होती की, जिल्हाधिकाऱ्यांना ‘दारू पिता का?’ विचारण्यासाठी, असं म्हणत मनीषा कायंदे यांनी अब्दुल सत्तारांवर हल्ला केला. कायंदे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते.

पुढे बोलताना त्या असंही म्हणाल्या की, सैराट झाल्यासारखे महाराष्ट्राची सत्ता उलथापालथ करुन, सरकार स्थापन केलं. सरकारी अधिकाऱ्यांशी दारूच्या गप्पा मारता. त्यामुळे या सैराटच्या नादात मिंधे गट नसून, हा झिंगे गट झाला आहे.

दरम्यान, अब्दुल सत्तारांचा व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तसेच हा व्हिडीओ काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी देखील आपल्या ट्विटर आकाऊंटवरून शेअर केला आहे. त्यामध्ये सावंतांनी म्हटलं की, “गम का दौर हो या हो खुशी, समा बाँधती है शराब, किसान मरे या करे खुदकुशी, समा बाँधती है शराब, एक मशवरा है जनाब के थोड़ी-थोड़ी पिया करो, हुई महँगी बहत ही शराब, के थोड़ी-थोड़ी पिया करो.”

महत्वाच्या बातम्या :

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.