Uddhav Thackeray | “आता घराबाहेर पडलो तर यांच्या पोटात…”; उद्धव ठाकरेंचा राज ठाकरेंवर निशाणा
Uddhav Thackeray | मुंबई : मुंबईतील नेस्को मैदानात झालेल्या मेळाव्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर टीका केली होती. एकनाथ शिंदेंनी एका रात्रीत कांडी फिरवली आणि ते आता सगळीकडे फिरत आहेत, असं म्हणत राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला होता. राज ठाकरेंच्या या वक्तव्यावर उद्धव ठाकरे यांनी (Uddhav Thackeray) प्रत्युत्तर दिलं आहे. आद्य क्रांतीवीर लहुजी वस्ताद साळवे यांच्या २२८ व्या जयंती निमित्ताने मुंबईत आयोजित कार्यक्रमात उद्धव ठाकरे बोलत होते.
“मी हळूहळू बाहेर पडतोय. आपलं सरकार असताना दोन वर्षे करोनात गेली. नंतर माझी शस्त्रक्रिया झाल्याने सहा महिने गेले. त्यामुळे मला घराबाहेर पडता येत नव्हते. मी घराबाहेर पडत नसल्याने हा घराबाहेर पडत नाही, अशी टीका करण्यात येत होती. आता घराबाहेर पडलो, तर यांच्या पोटात गोळा यायला लागला आहे,” अशी अप्रत्यक्षपणे टीका उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंवर केली आहे.
पुढे ते म्हणाले, “यांना आता शिवाजी महाराज हा आदर्श जुना वाटायला लागलाय. आज तर एका गद्दाराची तुलना शिवाजी महाराज यांच्याशी केली गेली. जसं काय शिवरायांच्या सुटकेला भाजपनेच मदत केली. लहुजींचं एक वाक्य होतं जगेन तर देशासाठी आणि मरेन तर देशासाठी.” मात्र आता जगेन तर सत्तेसाठी आणि मरेन तर सत्तेसाठी, अशी काहींची मानसिकता झाल्याचं म्हणत ठाकरेंनी मुख्यमंत्री शिंदे आणि भाजपला टोला लगावला.
काय म्हणाले होते राज ठाकरे?
“काल-परवा मुख्यमंत्री पदावर असलेले आणि आता बाहेर आहे. मुख्यमंत्री पदावर असताना ते तब्येतीचं कारण सांगून बाहेर पडत नव्हते. एकनाथ शिंदेंनी एका रात्रीत कांडी फिरवली आणि आता ते सगळीकडे फिरत आहेत. यांच्यासारखं वागणाऱ्यातला मी नाही. स्वत:चा स्वार्थ आणि पैशांसाठी दिसेल त्याचा हात धरायचा आणि बागेमध्ये कोपऱ्यात जाऊन बसायचं,” असे राज ठाकरेंनी म्हटलं होतं.
महत्वाच्या बातम्या :
- Basavaraj Bommai | सीमा प्रश्नावरील सुनावणीवर बसवराज बोम्मईंची प्रतिक्रिया; म्हणाले, “आमची बाजू संवैधानिक आणि…”
- Bad Breath | तोंड उघडताच येते दुर्गंधी?, तर करा ‘हे’ सोपे उपाय
- Sanjay Raut | बेईमान व्यक्तीशी शिवरायांची तुलना करुन महाराष्ट्राचा अपमान – संजय राऊत
- Udayanraje Bhosale | “राज्यपालांना वेड्याच्या हॉस्पिटलमध्ये पाठवा”; उदयनराजे भोसले यांची सडकून टीका
- One Day International | ODI क्रिकेट संपणार?, FICA ने जाहीर केला रिपोर्ट
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.