Uddhav Thackeray | “आनंदाचा शिधा वर, पैठणचा मिंधा…”, उद्धव ठाकरे गटाचा संदीपान भुमरेंच्या प्रतिमेवरुन खोचक टोला

Uddhav Thackeray | मुंबई : राज्य सरकारकडून दिवाळी मध्ये आनंदाचा शिडाचं वाटप केलं जातं आहे. अशातच संदीपान भुमरे (Sandipan Bhumare) यांनी आनंदाचा शिधा पॅकेट्सवर त्यांचा फोटो मोठा आणि देवेंद्र फडणवीस, नरेंद्र मोदी आणि एकनाथ शिंदे यांचे फोटो छोटे लावल्यावरुन उद्धव ठाकरे (uddhav Thackeray) गटाने सामनातून घणाघातल केला आहे. यावेळी संदीपान भुमरे (Sandipan Bhumare) प्रतिमा वाचवण्यासाठी कारनामे करत असल्याचं म्हणण्यात आलं आहे.

अनेक वर्षे विजयाचा गुलाल उधळणाऱ्या मतदारांसह शिवसेनेशी गद्दारी करणारे ‘इकासपुरुस’ संदिपान भुमरे यांना आता आपली ‘प्रतिमा’ जपण्यासाठी जिवाचा आटापिटा करावा लागत आहे. दिवाळीसाठी राज्य सरकारकडून आलेल्या ‘आनंदाचा शिधा’ किटवर प्रशासन व रेशन दुकानदारांवर दबाव टाकून चक्क आपला फोटो चिकटवून हे किट वाटप करण्याची केविलवाणी परिस्थिती त्यांच्यावर ओढवली आहे. भुमरेंच्या या कारनाम्यावर ‘आनंदाचा शिधा वर, पैठणचा मिंधा’ अशी कोटी करणाऱ्या चर्चेला उधाण आले असल्याचा टोला सामनातून लगावण्यात आला आहे.

सामनातून साधला निशाणा –

पैठण तालुक्यात पैठण शहर, पाचोड व बिडकीन येथे महसूल विभागाची धान्याची गोदामे आहेत. या तिन्ही गोदामांमधून तालुक्यातील एकूण 217 स्वस्त धान्य दुकानदार धान्य घेऊन जातात. दरम्यान, मिंधे सरकारने दिवाळी सणासाठी विशेष धान्य किट वितरित करण्याची घोषणा केली. त्यानुसार पैठण तालुक्यात हे धान्य किट उपलब्ध झाले या किटवर पंतप्रधान मोदी यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे फोटो आहेत. मात्र गोरगरिबांच्या घरात जाणाऱ्या या धान्याच्या किटवर आपला फोटो नाही. ही बाब भुमरे यांच्या लक्षात येताच त्यांनी लगोलग चेल्याचपाट्यांना कामाला जुंपले आणि पैठणमधील एका खासगी संगणक केंद्रातून मोदी, शिंदे आणि फडणविस यांच्या फोटोपेक्षाही आपल्या मोठ्या फोटोच्या शेकडो प्रिंट काढायला सांगितल्या, असं सामनातून उद्धव ठाकरेंना म्हटलं आहे.

यादरम्यान, फोटो येताच प्रत्येक किटवर फोटो चिकटवण्यासाठी यंत्रणा कार्यरत झाली. यात ‘इकासपुरुस’ भुमरे यांच्या फोटोच्या प्रिंट घेऊन त्यांचे लिंबूटिंबू कार्यकर्ते पैठण शहर, बिडकीन व पाचोड या तिन्ही गोदामांमध्ये पोहोचले. जवळपास 50 टक्के किटस् रेशन दुकानदारांनी नेल्याचे स्पष्ट झाले. असे असले तरी उर्वरित धान्य किट्सवर मिंधे गटाचे मंत्री भुमरे यांनी स्वतःचा मोठा फोटो चिटकवून घेतल्याची चर्चा तालुक्यात चांगलीच रंगत आहे, अशी टीका देखील करण्यात आली आहे.

महत्वाच्या बातम्या :

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.