Uddhav Thackeray | “आपला पक्ष पहिला, तुमचा पक्ष दुसरा म्हणणं बालिशपणा”; उद्धव ठाकरेंचा भाजपाला टोला

Uddhav Thackeray | मुंबई : राज्यातील 7 हजार 135 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा निकाल आज समोर येतोय. या निवडणुकीत भाजप आणि बाळासाहेबांची शिवसेना पक्ष यांच्या युतीला सर्वाधिक विजय मिळाल्याचा दावा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलाय. दरम्यान, उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी बोलताना त्यांनी भाजपला चांगलंच सुनावलं आहे.

उद्धव ठाकरे म्हणाले, “ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालावर समाधान की असमाधान असा प्रश्न नाही. या निवडणुकीचं वातावरण वेगळं असतं. काही ठिकाणी स्थानिक आघाड्या असतात तर काही ठिकाणी गावकरी एकत्र येऊन निवडणुका लढवत असतात. त्यामुळे हे कोणत्याही एका पक्षाचं यश, अपयश नाही. पहिला, दुसरा, तिसरा क्रमांक असं काही नसतं.“

“वर्षानुवर्षं आपण हे आकडे ऐकत आहोत. याच्यात फोलपणा किती हे कालांतराने कळतं. आपला पक्ष पहिला, तुमचा पक्ष दुसरा म्हणणं बालिशपणा आहे,” असंही उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यावेळी बोलताना म्हणालेत.

देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया

“ग्रामपंचायत निवडणुकीत बाळासाहेबांची शिवसेना आणि भाजप या आमच्या युतीला दणदणीत विजय मिळाला आहे. आतापर्यंत आलेल्या आकडेरीमध्ये आमच्या 3029 एवढ्या ग्रामपंचायती आल्या आहेत. महाराष्ट्राच्या सगळ्या भागांमध्ये सगळीकडे आमची सरशी झालेली आहे”, असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला.

महत्वाच्या बातम्या :

You might also like

Comments are closed.