Uddhav Thackeray | “आमचा मोर्चा हा देवेंद्र फडणवीस साईज होता”; उद्धव ठाकरेंचा पलटवार
Uddhav Thackeray | मुंबई : महापुरुषांबद्दल अपमानास्पद वक्तव्य करणारे राज्यपाल आणि भाजप नेत्यांविरोधात महाविकास आघाडीच्या वतीने मोर्चा काढण्यात आला होता. महामोर्चातून महाविकास आघाडीचं शक्तिप्रदर्शन आणि हल्लाबोलही पाहायला मिळाला. दरम्यान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी महाविकास आघाडीच्या महामोर्चावर टीका करत खिल्ली उडवली.
“जसा त्यांचा पक्ष नॅनो होत आहे, तसा त्यांचा मोर्चाही नॅनोच होता”, असा मिश्किल टोला देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी लगावला. यावर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. उद्धव ठाकरे यांनी पलटवार करत देवेंद्र फडणवीस यांच्या शरीरयष्टीवर टीका केली आहे. आमचा मोर्चा हा देवेंद्र फडणवीस साईज मोर्चा होता असं म्हणत उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर पलटवार केला आहे.
देवेंद्र फडणवीस काय म्हणाले होते?
ते म्हणाले, “तीन पक्ष एकत्र येऊन एवढा लहानसा मोर्चा निघाला. आज तुम्ही कुणीही ड्रोन शॉट नाही दाखवू शकलात. आज क्लोज अप दाखवावे लागले. कारण ड्रोन शॉट लायक मोर्चाचं नव्हता. आम्ही त्यांना विनंती केली होती की, आझाद मैदानावर या. पण, आझाद मैदानाएवढी संख्या राहणार नाही हे माहीत असल्यामुळं जिथं रस्ता लहान होतो, अशी जागा त्यांनी निवडली. या मोर्चाचं कुठलं विराट स्वरुप उद्धव ठाकरे यांना दिसलं ते माहिती नाही. जसा त्यांचा पक्ष नॅनो होत आहे, तसा त्यांचा मोर्चाही नॅनोच होता”, असा मिश्किल टोला देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी लगावला.
महत्वाच्या बातम्या :
- Uddhav Thackeray | “आपला पक्ष पहिला, तुमचा पक्ष दुसरा म्हणणं बालिशपणा”; उद्धव ठाकरेंचा भाजपाला टोला
- Devendra Fadanvis | ‘लव्ह जिहाद’बाबत महाराष्ट्रातही कायदा होणार?; देवेंद्र फडणवीस म्हणाले…
- Winter Session 2022 | NIT भूखंड मुद्द्यावरुन एकनाथ शिंदेंवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप, विरोधकांचा विधानसभेत गदारोळ
- Saroj Ahire | “विधीमंडळाच्या इमारतीमध्ये हिरकणी कक्षाची स्थापना”; सरोज अहिरे यांच्या हस्ते उद्घाटन
- Uddhav Thackeray | शिवसेना मजबूत आहे आणि ती आणखी मजबूत होईल – उद्धव ठाकरे
Comments are closed.