Uddhav Thackeray | “उद्धवसाहेब काळजी नसावी…”; ‘या’ नेत्याचा उद्धव ठाकरेंना शब्द
Uddhav Thackeray | रत्नागिरी : एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षामधून काही आमदार आणि काही खासदार आपल्यासोबत घेऊन भाजप पक्षासोबत युती केली, आणि राज्यात सरकार स्थापन केलं. यामुळे शिवसेना पक्ष पूर्णपणे कोलमडून गेला. शिवसेना पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेही एकटे झाले असून, आता त्यांच्याकडे केवळ हाताच्या बोटांवर मोजण्याइतकेच शिवसैनिक राहिले आहेत. अशी परिस्थिती असताना शिवसेना पक्षाचे नेते राजन साळवी यांनी उद्धव ठाकरे यांना एक शब्द दिला आहे.
राजन साळवी यांनी उद्धव ठाकरेंना दिला शब्द
माझी निष्ठा कायमस्वरूपी बाळासाहेब ठाकरे यांच्या चरणाशीच आहे. मी मरेपर्यंत शिवसैनिक म्हणूनच आहे. कुठंही जाणार नाही, असा शब्द राजन साळवी यांनी उद्धव ठाकरे यांना दिला आहे. मी शेवटच्या क्षणापर्यंत राजापूर-लांजा विधानसभा मतदारसंघातील लोकांची सेवा करणार असल्याचं त्यांनी सागितलं. पुढे बोलताना ते असंही म्हणाले की, मी रत्नागिरी विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढवण्यास इच्छुक नाही.
तसेच, राजन साळवी यांना नाणार प्रकरणी धमकी देण्यात आली होती. त्यावरही त्यांनी भाष्य केलं आहे.मला नाणार प्रकरणात धमकी आली होती. त्यानंतर पोलीस, एसआयडी यांनी रिपोर्ट दिला. आता मला केवळ रत्नागिरी जिल्ह्यातील पोलिसांची सुरक्षा आहे, असं राजन साळवी म्हणाले आहेत. माझी आधी देखील सुरक्षा होती. आता मला एसकोर्ट पुन्हा दिला आहे. मला धमकी दिल्यानंतर सुरक्षा दिली गेली, मी गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांना सुरक्षेबाबत पत्र दिले होतं. असेही राजन साळवी म्हणाले. सरकारने माझी सुरक्षा काढली. तर शिवसैनिक माझी काळजी घेतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.
दरम्यान, सत्तांतरानंतर शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गट असे दोन गट झाले असल्याचं पाहायला मिळतं आहे. तसेच, ठाकरे गटातील आणखिन काही नेते शिंदे गटात सामिल होणार असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे राजन साळवी यांनी उद्धव ठाकरेंना दिला शब्द दिलासादायक ठरणार आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Maharashtra Rain Update | राज्यात मुंबईसह ‘या’ भागांत मुसळधार पावसाची शक्यता
- Ajit Pawar | अजित पवार अडचणीत येणार! ‘या’ घोटाळ्याप्रकरणी ईडीकडून होणार चौकशी
- Sachin Sawant | “राज ठाकरेंना महाराज कळले असते तर…”; काँग्रेसचा राज ठाकरेंना टोला
- Gulabrao Patil | “अन्याय होत असेल तर…”, गुलाबराव पाटलांचा एकनाथ खडसेंवर पलटवार
- Arvind Sawant | “इतका छळवाद झाला तेव्हा राज ठाकरे गप्प होते, आता…”; अरविंद सावंत यांचा सवाल
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.