Uddhav Thackeray | उद्धव ठाकरेंच्या गटाच्या अडचणी वाढल्या!, ‘या’ बड्या नेत्यांवर अटकेची टांगती तलवार

Uddhav Thackeray | मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (Shivsena Uddhav Balasaheb Thackeray) पक्षाने तडीपार मोर्चा काढला होता. ठाकरे गटाचे नेते आणि कार्यकर्त्यांवर होणाऱ्या कारवाईच्या निषेधार्थ हा मोर्चा आयोजित करण्यात आला होता. ठाकरे गटाने पोलिसांवर दडपशाहीचा आरोप केला होता. यामध्ये उपस्थित असलेल्या बड्या नेत्यांवर तसेच आयोजकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गट अडचणीत आल्याचं म्हटलं जातं आहे.

अरविंद सावंत, भास्कर जाधव, विनायक राउत, अंबादास दानवे, राजन विचारे, केदार दिघे, मनोहर भोईर, बबन पाटील, चंद्रकांत डोलारे, भारत पाटील, अनिता बिर्जे, सुनिल प्रभु, नरेश रहाळकर, यांच्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

आदेशाची पायमल्ली, हेतू पुरस्कर इजा, बेकायदेशीर समूह जमवणे, त्याचा भाग असणे, मनुष्याला क्रोध येईल, अपमान वाटेल असे वक्तव्य करणे, चिथावणीखोर वक्तव्य, अब्रू नुकसान, शांतता भंग, अशा अनेक कलमांखाली हे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

दरम्यान, 100 केस घेतलेला मुख्यमंत्री बनतो, आणि एकही केस नसलेला तडीपार होतो. मुख्यमंत्र्यांची सुपारी घेऊन शिवसैनिकांना संपवण्याचा प्रयत्न केला तर आम्हालाही कायदा कळतो, असा इसारा शिवसेना पक्षाचे नेते विनायक राऊत यांनी डीसीपींना दिला होता.शिवसैनिकांना पोलीस संरक्षणाची गरज नाही, आम्ही रजनी पटेल यांना घाबरलो नाही आता मितेशला काय घाबरणार, असं देखील ते म्हणाले होते.

महत्वाच्या बातम्या :

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.