Uddhav Thackeray | उद्धव ठाकरेंच्या चिंतेत भर? मुंबई महानगरपालिकेच्या दोन बड्या अधिकाऱ्यांच्या घरावर ED ची छापेमारी

Uddhav Thackeray | मुंबई: बृहन्मुंबई महानगरपालिकेतील कोविड घोटाळा प्रकरणी ईडी चौकशी (ED inquiry) करत आहे. या घोटाळा प्रकरणी ईडीनं काल 16 ठिकाणी छापेमारी केली. या छापेमारीत उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्या निकटवर्तीयांचा समावेश होता. या चौकशीनंतर उद्धव ठाकरे गट अडचणीत सापडला आहे. अशात मुंबई महानगरपालिकेच्या दोन अधिकाऱ्यांच्या घरी आज सकाळी ईडीनं धाड टाकली आहे.

आज सकाळी ईडीनं मुंबई महानगरपालिकेतील तत्कालीन वैद्यकीय अधिकारी हरीश राठोड आणि तत्कालीन उपायुक्त रमाकांत बिरादर यांच्या निवासस्थानी छापेमारी केली आहे. ईडीनं दोघांच्या घरात चौकशी केली आहे. त्याचबरोबर दोन्ही अधिकाऱ्यांच्या (Uddhav Thackeray) घराबाहेर बंदोबस्त करण्यात आला आहे.

Ed has raided Surat Chavan house who is close to Aditya Thackeray

आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय सूरज चव्हाण यांच्या घरी काल ईडीनं छापेमारी केली. सुरज चव्हाण यांच्या चेंबूर येथील निवासस्थानी ईडीनं धाड टाकली. ही चौकशी सुरू असताना ठाकरे गटाच्या (Uddhav Thackeray) कार्यकर्त्यांनी इमारतीच्या बाहेर गर्दी करत ईडीला विरोध केला.

दरम्यान, लाईफ लाईन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्विसने कोविड काळात केलेल्या घोटाळ्यावरून ईडी ही चौकशी करत आहे. आर्थिक गुन्हे विभागाकडून या प्रकरणाची चौकशी सुरू होती. आता या प्रकरणामध्ये ईडीने उडी घेतलेली असून त्यांनी एकूण 15 ठिकाणी (Uddhav Thackeray) सर्च ऑपरेशन सुरू केलं आहे.

महत्वाच्या बातम्या

Original NEWS SOURCE – https://maharashtradesha.com/uddhav-thackeray-worried-about-ed-raid-on-bmc-officials-house/?feed_id=45439