Uddhav Thackeray | उद्धव ठाकरेंना दिलासा! समता पक्षाची याचीका न्यायालाने फेटाळली
Uddhav Thackeray | मुंबई : निवडणूक आयोगाने धनुष्यबाण चिन्ह आणि शिवसेना नाव गोठवल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे असं नाव देत मशाल चिन्ह दिलं होतं. मात्र, समता (Samta Party) पक्षाने मशाल चिन्हावर दावा केला होता. तशी याचिका देखील कोर्टात देण्यात आली होती. या प्रकरणी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना दिलासा मिळाला आहे.
उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना दिलासा –
समता पक्षाने मशाल चिन्हावर दावा करत याचिका दाखल केली होती. ही याचिका न्यायालयाने फेटाळली असून उद्धव ठाकरे यांना दिलासा मिळाला आहे.
1994 सालापासून मशाल हे आमच्या पक्षाचे चिन्ह आहे, असा दावा दिवंगत नेते जॉर्ज फर्नांडिस यांच्या समता पार्टीने आयोगाने दिलेल्या ‘मशाल’ चिन्हावर केला आहे. त्यांच्या दाव्यामुळे ठाकरे गटाच्या अडचणींमध्ये आणखिन वाढ होती.
समता पक्षाचा दावा –
ECI ने शिवसेना – उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाला मशाल चिन्ह मंजूर केले आहे. परंतु मशाल हे चिन्ह 2004 मध्ये निवडणूक आयोगाकडे समता पक्षाचे नोंदणीकृत चिन्ह आहे. आमचा पक्ष 1994 पासून राष्ट्रीयीकृत पक्ष आहे आणि आमची जनमानसात चांगली प्रतिष्ठा आहे. तरी तुम्हाला विनंती आहे की शिवसेनेला मशाल व्यतिरिक्त कोणतेही चिन्ह द्यावे, असे समता पक्षाने म्हटलं होतं.
महत्वाच्या बातम्या :
- Ravi Rana । “बच्चू कडू सोंगाड्या, तोडीबाज, नौटंकीबाज” ; रवी राणा यांचा आक्रमक पलटवार
- Eknath Shinde Group | “मी स्वत:ला मुख्यमंत्री समजतो” ; शिंदे गटातील आमदाराचे विधान
- Uddhav Thackeray । उद्धव ठाकरेंच्या बेहिशेबी मालमत्तेची ED-CBI कडून चौकशी करण्याची मागणी; मुंबई हायकोर्टात आज सुनावणी
- Sandipan Bhumare | संदिपान भुमरे यांच्यावर दुःखाचं डोंगर ; जवळच्या व्यक्तीचं निधन
- Bachhu Kadu | “महाठग खिसे कापणारे आणि…”; बच्चू कडू यांची राणा दाम्पत्यावर सडकून टीका
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.