Uddhav Thackeray | “उद्धव ठाकरेंना मशाल नाही, आईस्क्रीमचा कोन दिलाय”, नितेश राणेंच्या वक्तव्यावर सेनेचा पलटवार

मुंबई : राज्यातील राजकीय वर्तुळात अनेक घडामोडी घडत आहेत. त्यामुळे राजकीय वातावरणही गरम होत असल्याचं दिसून येतं आहे. त्यामध्ये विरोधी आणि सत्ताधारी पक्षनेते एकमेकांविरोधात आरोप-टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीय. अशातच भाजप (BJP) पक्षाचे नेते नितेश राणे(Nitesh Rane) यांनी उद्धव ठाकरे गटाला अंधेरी (पूर्व) पोटनिवडणुकीमध्ये (Election) मिळालेल्या ‘मशाल’ चिन्हावरून वक्तव्य केलं. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेचे (Shivsena) नेते रविंद्र वायकर (Ravindra Vaykar) यांनी त्यांना जशाच तसं प्रत्युत्तर दिलं आहे.

काय म्हणाले रविंद्र वायकर ?

ती मशाल नसून कोन आहे असं त्यांचं म्हणणं असेल तर त्यांनी ते तोंडात घेऊन बघावं. तोंडात घेतल्यानंतर तो आईस्क्रीमचा कोन आहे की मशाल आहे हे चटके बसल्यानंतर कळू शकतं, असं म्हणत रविंद्र वायकर यांनी नितेश राणे यांना चांगलंच फटकारलं आहे. रविंद्र वायकर यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते.

काय म्हणाले होते नितेश राणे ?

अंधेरी (पूर्व) पोटनिवडणुकीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे. त्यामुळेच काल अर्ज सादर करण्याच्या निमित्ताने दोन्ही बाजूने जोरदार शक्तीप्रदर्शन केलं गेलं. अनेक मोठे नेते अंधेरीमधील निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयामध्ये उपस्थित होते. त्यावेळी नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे गटाला लक्ष्य केलं.

नितेश राणे म्हणाले होते की, “उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) या माणसाचं चिन्ह हे मशाल नाही कारण त्याच्यातली आग कधीच विझली आहे. खरं तर आईस्क्रीमचा कोन मिळाला आहे जो थंड पडलेला आहे,” असं नितेश राणे म्हणाले. “मशाल नाहीच आहे की आइस्क्रीमचा कोन आहे. उद्धव ठाकरेचं मशाल हे चिन्ह होऊच शकत नाही. त्या माणसामधली आग संपलेली आहे,”

महत्वाच्या बातम्या :

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.