Uddhav Thackeray | मुंबई : शिवसेनेत एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंडखोरी केल्यानंतर शिवसेनेच्या ठाकरे गटाला मोठी गळती लागली आहे. ठाकरे गटाला एकामागे एक धक्के बसत आहेत. केंद्रीय निवडणूक आयोगाने (Election Commission of India) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला शिवसेनेचे नाव आणि चिन्ह दिले आहे. त्यामुळे शिंदे यांचाच पक्ष हा अधिकृत शिवसेना असल्याचे कागदोपत्री स्पष्ट झाले आहे.
ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यासाठी हा सर्वात मोठा झटका आहे. उद्धव ठाकरे यांच्या जवळच्या माणसांनी उद्धव ठाकरेंकडे पाठ फिरवली आहे. ठाकरे गटातील अनेक दिग्गज नेत्यांनी एकनाथ शिंदेंच्या गटात सामिल झाले आहेत.
दीपक सावंत यांचा शिंदे गटात प्रवेश
माजी आरोग्यमंत्री दीपक सावंत यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश झाला. पक्षप्रवेश सोहळा पार पडल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दीपक सावंत (Deepak Sawant) यांच्यासमवेत पत्रकार परिषद घेत प्रसारमाध्यमांशी संवाद साधला आहे.
मुंबई येथे पत्रकार परिषद व जाहीर पक्षप्रवेश | १५/३/२०२३ https://t.co/2Y0IQ0pdTl
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) March 15, 2023
“माजी आरोग्यमंत्री दीपक सावंत यांचं मी मनापासून शिवसेनेत स्वागत करतो. दीपक सावंत यांनी मंत्री म्हणून काम केलंच आहे. पण बाळासाहेबांच्या विचारांनी प्रभावित होऊन त्यांनी मंत्री नसतानाही अतिशय दुर्गम भागात काम केलं. त्याचा परिणाम देखील लोकांना पाहायला मिळाला”, असे एकनाथ शिंदे म्हणाले आहेत.
Deepak Sawant Entered Shinde Groups
“दुर्गम भागात चांगले उपचार मिळाले पाहिजेत, अशी संकल्पना त्यांनी मांडली. त्यांचा रुग्णालयांनादेखील फायदा झाला. शासकीय रुग्णालयात ज्या त्रुटी आहेत, त्या निदर्शनास आणून देणे आणि त्यावर उपाय करणे, याबाबतही त्यांनी मोठं काम केलं. आरोग्य मंत्री असताना त्यांनी सर्वसामान्य नागरिकांना मोठी सेवा दिली”, असे एकनाथ शिंदे म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या-
- Uddhav Thackeray | “…म्हणून डोळे मिटून भाजपमध्ये गेलात का?” उद्धव ठाकरेंचा खोचक सवाल
- Ajit Pawar | “कसब्यातला निकाल सत्ताधाऱ्यांना झोंबलाय त्यामुळं…”; अजित पवारांनी पुन्हा भाजपला डिवचलं
- Uddhav Thackeray | “घरी बसून जे केलं ते सूरत, गुवाहाटीला जाऊन नाही जमलं”; उद्धव ठाकरेंचे शिंदे गटावर ताशेरे
- Devendra Fadnavis | “दादा तुम्ही कडक स्वभावाचे त्यामुळे तुम्ही…”; अजित पवारांच्या ‘त्या’ प्रश्नाला फडणवीसांचं उत्तरs
- Shivsena | महाराष्ट्राच्या सत्तासंषर्घाचा लढा अंतिम टप्प्यात; घटनापीठाकडून आज, उद्याची वेळ राखीव