Uddhav Thackeray | उद्धव ठाकरे गटाच्या मशाल चिन्हावर समता पक्षाचा दावा; आजच्या सुनावणीत नेमकं काय झालं?

Uddhav Thackeray | मुंबई: शिवसेनेत फूट पडल्यानंतर ठाकरे गटाला केंद्रीय निवडणूक आयोगानं मशाल चिन्ह दिलं होतं. समता पक्षांनं या मशाल चिन्हावर दावा करत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. समता पक्षाच्या या याचिकेची आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली.

After Eknath Shinde’s rebellion, Shivsena split into two groups

एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंडखोरी केल्यानंतर शिवसेनेचे दोन गट पडले. त्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना शिंदे गटाला धनुष्यबाण तर शिवसेना ठाकरे गटाला (Uddhav Thackeray) मशाल चिन्ह देण्याचा निर्णय घेतला होता.

परंतु, ठाकरे गटाच्या मशाल चिन्हावर समता पक्षानं आक्षेप घेत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. समता पक्षाकडं याबाबत संपूर्ण कागदपत्र नसल्यामुळं आजची सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे.

समता पक्षानं दाखल केलेल्या या याचिकेमुळे उद्धव ठाकरे गट (Uddhav Thackeray) पुन्हा एकदा संकटात सापडला आहे. यासंदर्भातील पुढील सुनावणी 31 जुलै रोजी पार पडणार आहे. या सुनावणीमध्ये नेमकं काय घडेल? याकडे ठाकरे गटासह संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे.

दरम्यान, समता पक्षानं पक्षाच्या चिन्हासंदर्भात दिली हायकोर्टात याचिका दाखल केली होती. मात्र, दिल्ली हाय कोर्टाने त्यांची ही याचिका फेटाळली होती. त्यानंतर त्यांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये याबाबत याचिका दाखल केली. सर्वोच्च न्यायालय याबाबत काय निर्णय (Uddhav Thackeray) देतील? हे पाहण्यासारखं असणार आहे.

महत्वाच्या बातम्या

Original NEWS SOURCE – https://bit.ly/475flGv