Uddhav Thackeray | ‘उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री होऊ शकतात’ ; कायदे तज्ञांचं मोठे विधान

Uddhav Thackeray | पुणे: राज्यातील सत्ता संघर्षाचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने रोखून ठेवला आहे. मात्र, लवकरच हा निर्णय लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सर्वोच्च न्यायालय काय निकाल देणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या निकालानंतर शिंदे-फडणवीस सरकार जाणार की राहणार? अशा चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. अशात उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री होऊ शकतात, असं मोठं विधान कायदेतज्ञ उल्हास बापट यांनी केला आहे.

उल्हास बापट म्हणाले, “आत्ताच्या अध्यक्षांनाच हा अधिकार मिळणार आहे. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने कठीण निर्णय दिला आहे. बहुमत सिद्ध करण्यासाठी राज्यपालांनी जे सत्र बोलावलं होतं, ते मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानं बोलवण्यात आलं नव्हतं. त्यामुळे राज्यपालांचे आदेश चुकीचे आहे, असा अर्थ सर्वोच्च न्यायालयाने लावला तर सर्वोच्च न्यायालय स्टेट्सको अँटी निर्माण करू शकतो. म्हणजे परिस्थिती पूर्वावत होऊ शकते. आणि उद्धव ठाकरे पुन्हा एकदा मुख्यमंत्री होऊ शकतात.

निकाल कधी लागणार? (When will the results be available?)

न्यायमूर्ती शाह 15 मे रोजी निवृत्त होणार असल्याची माहिती असीम सरोदे यांनी दिली आहे. सत्ता संघर्षाचा निकाल 11 किंवा 12 मे रोजी लागण्याची शक्यता असीम सरोदे यांनी व्यक्त केली आहे. सत्ता संघर्षावर दीर्घ युक्तिवाद झाल्यानंतर न्यायालय नक्की काय निकाल देणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, राज्यातील सत्ता संघर्षाच्या निकालाबाबत असलेल्या शक्यतांबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाराजी व्यक्त केली आहे. ते म्हणाले, “सुप्रीम कोर्टाने निर्णय जाहीर करण्यापूर्वी राज्यातील काही राजकीय पंडितांनी निर्णय देऊन टाकलं आहे आणि सरकारही तयार केलं आहे. हे मला योग्य वाटत नाहीये. सर्वोच्च न्यायालय खूप मोठं कोर्ट आहे. त्यामुळे सर्वांनी शांतपणे निर्णयाची वाट बघावी.”

महत्वाच्या बातम्या