Uddhav Thackeray | “उद्धव ठाकरे शिवसेना वाचवण्यासाठी पंढरीच्या वारी ऐवजी हैद्राबादची वारी करतील”
Uddhav Thackeray | पंढरपूर : उध्दव ठाकरे (Uddhav Thackeray) शिल्लक शिवसेना वाचवण्यासाठी पंढरीच्या वारी ऐवजी ओवैसींना सोबत घेण्यासाठी हैद्राबादची वारी करतील, असा टोला भाजप आध्यात्मिक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष तुषार भोसले (Tushar Bhosale) यांनी आज पंढरपुरात बोलताना लगावला.
उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब आंबेडकर एकत्र येणार आहेत अशी चर्चा सुरू झाली आहे. याविषयी त्यांना विचारले असता उद्धव ठाकरे यांच्यावर त्यांनी निशाणा साधला. खरी शिवसेना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या सोबत आहे. शिल्लक शिवसेना वाचवण्यासाठी उद्धव ठाकरे यांचा विषारी लोकांबरोबर युती करण्याचा प्रयत्न सुरू आहे.
महाविकास आघाडी सरकारच्या काळात लव्ह जिहादसाठी पोषक वातावरण तयार झाले होते. त्यामुळे अशा घटना घडत आहेत. परंतु, यापुढे अशा धर्मविरोधी कारवायांना थारा दिला जाणार नाही, असे यावेळी तुषार भोसले यांनी सांगितले.
दरम्यान संभाजी भिडे यांनी महिला विषयी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याशी मी सहमत नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
महत्वाच्या बातम्या :
- Bachchu Kadu | रवी राणा यांनी तलवार घेऊन यावे मी… ; बच्चू कडू यांची प्रतिक्रिया
- Sushma Andhare | “चिमणराव, म्हातारपणात तुम्ही गद्दारीचा डाग का लावून घेतला?”
- Lunar Eclipse | खगोलप्रेमींसाठी 8 नोव्हेंबरला दिसणार वर्षातले शेवटचे चंद्रग्रहण
- Sambhaji Bhide | भिडे आजोबांना नातीने लिहिलेलं खुलं पत्र; “पत्रास कारण की…”
- Saamana | सामनाच्या पहिल्याच पानावर खोके सरकारची जाहीरात, राजकीय चर्चांना उधाण
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.