Uddhav Thackeray |”उद्या पाकिस्तान निवडणुकीसाठी आपल्या देशात सुट्टी देतील” ; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारला टोला

Uddhav Thackeray | मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आज पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यावर निशाणा साधला. “महाराष्ट्रात ईडी, खोके, मिंधे सरकार आहे. या सरकारमध्ये मुख्यमंत्री आहेत का, ते कळतच नाही”,असा टोला त्यांनी एकनाथ शिंदे यांना लगावला आहे.

येत्या १ आणि ५ डिसेंबर रोजी गुजरातमधील विधानसभा निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. महाराष्ट्रातील पालघर, नाशिक, नंदुरबार आणि धुळे जिल्ह्यातील ज्यांची नावे गुजरात राज्यातील मतदार यादीत आहेत, त्यांना मतदानासाठी सुट्टी देण्यात आली आहे. तसे आदेश राज्य सरकारने काढले आहेत. सरकारच्या याच आदेशावरून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिंदे गट-भाजपा सरकारवर टीका केली आहे.

“गुजरातच्या निवडणुकीसाठी महाराष्ट्रात सुट्टी देण्यात आली आहे. उद्या पाकिस्तानमध्ये निवडणुका असतील तर पूर्ण देशाला सुट्टी जाहीर करतील”, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकारला टोला हाणला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagatsingh Koshyari) यांच्या वादग्रस्त वक्तव्याचा देखील समाचार घेतला आहे.

राज्यपालांच्या सडक्या मेंदूमागे कोण आहे?, असा सवाल करत अधिक चांगला वृद्धाश्रम असेल, तर राज्यपाल कोश्यारी यांना तिकडे पाठवा, असा खोचक टोला शिवसेना ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांनी लगावला. “त्यांना राज्यपाल म्हणण मी सोडून दिलंय. कारण राज्यपाल पदाची झुल पांघरली म्हणजे त्यांनी काहीही वेडवाकडं बोलावं. हे काही महाराष्ट्र मान्य करणार नाही”, असंही उद्धव ठाकरे यावेळी बोलताना म्हणालेत.

महत्वाच्या बातम्या :

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.