Uddhav Thackeray | उमेश कोल्हे प्रकरणात उद्धव ठाकरेंची चौकशी होणार, शंभूराज देसाई यांची घोषणा

Uddhav Thackeray | मुंबई : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. उमेश कोल्हे खून प्रकरणात उद्धव ठाकरे यांनी अमरावती पोलिसांवर दबाव आणला होता का, याची चौकशी करण्याचे आदेश महाराष्ट्र सरकारने शुक्रवारी दिले. उद्धव ठाकरे यांनी अमरावतीच्या पोलीस आयुक्त आरती सिंग यांना कोल्हे यांच्या हत्येचा तपास दरोड्याच्या अँगलने करण्यास सांगितले होते का, याचा तपास राज्य गुप्तचर विभाग (एसआयडी) करणार असल्याचे मंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितले. उमेश हत्या प्रकरणाचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणा करत आहे.

अमरावतीतील अपक्ष आमदार रवी राणा यांनी शुक्रवारी विधानसभेत उमेश हत्या प्रकरणाचा मुद्दा उपस्थित केला. उद्धव ठाकरे राज्याचे मुख्यमंत्री असताना 21 जून रोजी कोल्हे यांची हत्या झाली होती, मात्र पोलिसांनी या प्रकरणाचा तपास दरोड्याच्या अँगलने केला असल्याचे आमदार रवी राणा यांनी सांगितले. उद्धव ठाकरे यांनीच एका स्थानिक काँग्रेस नेत्याच्या सांगण्यावरून पोलीस आयुक्त आरती सिंग यांना या प्रकरणातील चौकशी दरोड्याच्या अँगलने करण्यासाठी सांगितले. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या फोन कॉल्सची विशेष तपास पथकामार्फत चौकशी व्हावी, अशी आमची इच्छा आहे, असे रवी राणा म्हणाले.

यावर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वतीने उत्तर देताना मंत्री शंभूराज देसाई उद्धव ठाकरे यांची चौकशी करणार असल्याची घोषणा केली. ही चौकशी गुप्तचर विभागाच्या आयुक्तांमार्फत करण्यात येईल. त्याचा अहवाल पंधरा दिवसांत मागविण्यात येईल, अशी घोषणा मंत्री शंभूराज देसाई यांनी विधानसभेत केली.

महत्वाच्या बातम्या : 

You might also like

Comments are closed.