Uddhav Thackeray | “कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांच्या अंगात भूत संचारलंय”; उद्धव ठाकरेंचा जोरदार हल्लाबोल

Uddhav Thackeray | मुंबई : महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावरून (Maharashtra-Karnataka Borderism) सध्या राज्यातील राजकारण तापलेलं आहे. संयुक्त महाराष्ट्र चळवळीनंतर महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आलं. या घटनेला आता सात दशकांहून जास्त काळ उलटला. मात्र, कर्नाटकसोबत असलेला सीमाप्रश्न अजूनही सुटलेला नाही. सीमाभागातील अनेक गावांना महाराष्ट्रात सामील होण्याची इच्छा असल्याचा दावा सातत्याने महाराष्ट्राकडून केला जात आहे.

बेळगावमध्ये यावरून मोठा संघर्ष पाहायला मिळाला आहे.  त्यात आता सांगलीतील जत तालुक्यातल्या ४० गावांवरही दावा करण्याची तयारी बोम्मई सरकारने केल्याचं समोर आलं आहे. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंनी आज पत्रकार परिषद घेऊन कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांसह, छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त विधान करणारे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagatsingh Koshyari)  या मुद्द्यांवरुन भाजपवर सडकून टीका केली.

ते म्हणाले, “गेल्या काही महिन्यांपासून आपण पाहातोय, महाराष्ट्रात खोके सरकार किंवा मिंधे सरकार आल्यानंतर राज्याची सातत्याने अवहेलना होतेय. आज अचानक कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांच्या अंगात भूत संचारलंय. जणूकाही महाराष्ट्रात माणसं राहातच नाहीत. महाराष्ट्राला स्वाभिमान, अस्मिता, हिंमत काहीच नाहीये. कुणीही यावं, टपलीत मारावं आणि आम्ही छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणून गप्प बसावं, हे आता खूप झालं.”

“कर्नाटकचे मुख्यमंत्री गेले दोन दिवस महाराष्ट्राला गृहीत धरत आहे. सतत आपल्या अस्मितेला हात घालत आहे आणि कुणाला काही वाटत नाही?”, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी यावेळी बोलताना उपस्थित केलाय. महाराष्ट्र शिवाजी महाराजांना मानतोच हे काही वेगळं सांगायची गरज नाही. त्यांचा अपमान झाल्यानंतर गुळमुळीत प्रतिक्रिया दिल्या जात आहेत. ज्यांनी महाराजांचा अपमान केला, त्यांच्याच पक्षातल्या नेत्यांकडून दिल्या जात आहेत”, असं म्हणत उद्धव ठाकरे Uddhav Thackeray) यांनी भाजपवर निशाणा साधला.

महत्वाच्या बातम्या :

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.