Uddhav Thackeray | ‘कलंक’ मतीचा झडो; ठाकरे गटाचा देवेंद्र फडणवीसांवर हल्लाबोल

Uddhav Thackeray | मुंबई: सध्या ‘कलंक’ या शब्दावरून राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचा ‘नागपूरला लागलेला कलंक’ असा उल्लेख केला होता. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्या टीकेला सडेतोड उत्तर दिलं. त्याचबरोबर उद्धव ठाकरे यांच्या या वक्तव्यावर भाजप कार्यकर्त्यांनी प्रतिक्रिया दिली. याच प्रकरणावर आज सामना अग्रलेखात भाष्य करण्यात आलं आहे. महाराष्ट्रातील संस्कृती कलंकित करण्याचा विडा काही लोकांनी स्वीकारला असल्याचं आजच्या सामना अग्रलेखात म्हटलं आहे.

भाजपनं राज्यात सरकार स्थापन केलं. हा महाराष्ट्राच्या प्रतिमेस शेण फासण्याचाच प्रकार आहे. राज्यातील राजकारणामध्ये नीतीतत्त्वाचं  महत्त्व संपलं आहे. भाजपच्या जुन्याजाणत्या नेत्यांच्या नशिबी भ्रष्ट लखोबांच्या सतरंज्या उचलणं एवढचं आलं. हा प्रकार म्हणजे सहन होत नाही व सांगताही येत नाही असाच आहे, असं आजच्या सामना अग्रलेखात (Uddhav Thackeray) म्हटलं आहे.

Read the Samana Editorial

फडणवीस म्हणतात, ज्यांच्यावर शेण खाल्ल्याचे आरोप केले त्यांच्या पंक्तीला बसणे हे बरे आहे काय? देवेंद्रजी हा प्रश्न तुम्ही स्वतला विचारला तर बरे होईल. शिंदे-मिंधे गटातील आमदार, खासदारांचे हात व तोड शेणाने बरबटले आहेच. आता अजित पवारांचे चक्की पिसिंग, हसन मुश्रीफांचा घोटाळा, भुजबळ हर्षवर्धन पाटलांपासून ते राहुल कुलपर्यंत हजारो कोटीच्या घोटाळयांचे शेण सरकारच्या तोंडात गेले आहे. महाराष्ट्राने संस्कृतीच्या बाबतीत नेहमीच फुले वेचली तेथे गोवरा वेचण्याची वेळ महाराष्ट्रावर ज्यांनी आणली त्यांची घाणेरडी वकिली फडणवीस करीत आहेत. म्हणूनच तुम्ही कलंकित आहाता ईश्वर तुम्हाला सुबुद्धी देवो. ‘कलंक’ मतीचा झडो इतकीच प्रार्थना

सुसंगती सदा घडो सुजन वाक्य कानी पडो ‘कलंक’ मतीचा झडो विषय सर्वथा नावडो सदन्ध्री ‘कमळी दडो मुरडीता हटाने अडो वियोग घडता रडी मन भक्चरित्री जडो – मोरोपंत (केकावली)

महाराष्ट्रातील संस्कृती ‘कलंकित’ करण्याचा विडा काही लोकांनी स्वीकारला आहे. त्यांच्यासाठी मोरोपंतांच्या या ओळी मार्गदर्शक ठराव्यात. काही लोकांची मती कलंकित झाली आहे आणि त्यांची कलंकित मती हेच महाराष्ट्राचे ज्ञान, शहाणपण व मास्टर स्ट्रोक असा काही जणांनी समज करून घेतला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे ‘मास्टर स्ट्रोक’ •मारतात असे त्यांचे पगारी भगतगण नेहमी सांगतात. लोकमान्य टिळक सांगायचे, एक आण्याचा गांजा, चिलीम मारली की भरपूर कल्पना काही लोकांना सुचतात.

भाजपच्या पगारी भजनी मंडळाचे तसेच आहे. श्री. फडणवीस यांनी आता असा ‘स्ट्रोक’ मारला आहे की, त्यावर भाजपचेच लोक अचंबित झाले. श्रीमन फडणवीस म्हणाले, ‘ज्यांच्यावर शेण खाल्ल्याचा आरोप केला त्यांच्यासोबत पंक्तीला बसून खाणे हा कलंक आहे. फडणवीस यांनी स्वतच्या मनाची व्यथा अशा प्रकारे व्यक्त केलेली दिसते. आता कोण कोणाच्या पंक्तीला बसून काय खात आहे हे संपूर्ण महाराष्ट्र पाहतो आहे.

हा शेण खाण्याचा कलंकित प्रकार फक्त महाराष्ट्रात नव्हे, तर देशभर सुरू आहे व त्यात महाराष्ट्र सर्वाधिक कलंकित होत आहे. आम्ही विदर्भाच्या दौयात सांगितले, देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरला कलंकित केले. हा कलंक बाण त्यांच्या भक्तमंडळाच्या काळजात घुसला व त्यांनी त्यावर थयथबाट सुरू केला. ही कलंकित नाचेगिरी गेल्या काही काळापासून महाराष्ट्र सहन करतोय. महाराष्ट्रात पूर्वी एकच लखोबा लोखंडे होता. आज अनेक नामचीन

लखोबा लोखंडयांना घेऊन

‘भाजपने सरकार स्थापन केले. महाराष्ट्राच्या प्रतिमेस शेण फासण्याचाच हा प्रकार राज्यातील राजकारणात नीतीतत्त्वाचे महत्व संपले. भाजपच्या जुन्याजाणत्या नेत्यांच्या नशिबी भ्रष्ट लखोबांच्या सतरंज्या उचलणे एवढेच आले. हा प्रकार म्हणजे सहन होत नाही व सांगताही येत नाही असाच आहे. देवेंद्र फडणवीस हे कलंकित नाहीत. ते एक थोर महात्मा किंवा गौरवपुरुष आहेत असे एकवेळ मान्य करू, मग दोन्ही मांडयांवर कलंकित दुर्योधन, कंसमामा, रावणास बसवून ते कोणते नीतीचे राज्य चालवीत आहेत? सत्य असे की महाराष्ट्राच्या राजकारणात कटुता आणायचे काम फडणवीसांनी केले.

त्यांचे मास्टर स्ट्रोक म्हणजे काय? हाताशी केंद्रीय तपास यंत्रणा आहेत म्हणून हे मास्टर स्ट्रोक, ज्या दिवशी दिल्लीची सत्ता जाईल त्याक्षणी या मास्टर स्ट्रोकचे काय होईल? यंत्रणांची दहशत माजवून चाणक्यगिरी चालली आहे. वाला मर्दानगी म्हणता येत नाही. हा कलंकच आहे. फडणवीस म्हणतात, ज्यांच्यावर शेण खाल्ल्याचे आरोप केले त्यांच्या पंक्तीला बसणे हे बरे आहे काय?” देवेंद्रजी, हा प्रश्न तुम्ही स्वतला विचारला तर बरे होईल. शिंदे-मिधे गटातील आमदार, खासदारांचे हात व तोंड शेणाने बरबटले आहेच. कुणाकुणाची नावे घ्यायची? आता अजित पवारांचे चक्की पिसिंग, हसन मुश्रीफांचा घोटाळा, भुजबळ हर्षवर्धन पाटलांपासून ते राहुल कुलपर्यंत हजारो कोटींच्या घोटाळयांचे शेण सरकारच्या तोंडात गेले आहे. या शेणास तुम्ही नागपूरची बासुंदी म्हणत असाल तर या आजारावर

एखादा उपचार

करूनच घ्या. स्वत शेण खायचे व दुसऱ्यांच्या तोंडाचा वास घ्यायचा असे एकंदरीत तुमचे धोरण दिसते. महाराष्ट्रा परंपरा व संस्कृतीवर शेणफेक करण्यात तुम्ही धन्यता मानत आहात. भ्रष्टाचारी गुन्हेगार, व्यभिचारी अशा लोकांना भाजपच्या वॉशिंग मशीनमध्ये घालून त्यावर चादीचा वर्ख चढवायचा व बाजारात उभे करायचे. या घाणेरड्या राजकारणास ‘कलंक’ नाही म्हणायचे तर काय म्हणायचे? भारतीय जनता पक्ष हा अटल बिहारी वाजपेयींच्या काळातला राहिलेला नाही व नागपूरही आता खया संघ विचारांचे उरलेले नाही तेथे भेसळ फार झाली आहे.

क्षणभंगूर सत्ता संपादनासाठी भ्रष्टाचारी लोकांशी शय्यासोबत करण्यास नैतिकतेचे बिरुद मिरवणारयांनाही लाज वाटत नाही. अजित पवार मुश्रीफ, गोंदियाचे पटेल, भुजबळ हे कलंकित की स्वच्छ राजकीय चारित्र्याचे हे फडणवीसांनी जाहीर करावे. फुटलेल्या शिवसेना आमदारांवरील ‘ईडी’ कारवाईच्या फायली कोणत्या बैलांच्या गोठयात दडपून त्यावर शेणस यांनी सारवण केले तेसुद्धा सांगा महाराष्ट्राच्या संस्कृती व परंपरेची माहिती नसलेले लोक सतेवर विराजमान झाले. महाराष्ट्राने संस्कृतीच्या बाबतीत नेहमी फुले वेचली तेथे गोवया वेचण्याची वेळ महाराष्ट्रावर ज्यांनी आणली त्यांची घाणेरडी वकिली फडणवीस करीत आहेत. म्हणूनच तुम्ही कलकित आहात ईसर तुम्हाला सुबुद्धी देवी ‘कलंक’ मतीचा झडो इतकीच प्रार्थना

सौजन्य – सामना

महत्वाच्या बातम्या

Original NEWS SOURCE – https://bit.ly/3JTx8pS