Uddhav Thackeray | “खोक्यांना भोकं पडायला लागली…”, उद्धव ठाकरेंचा कडू-राणा वादावर टोला
Uddhav Thackeray | मुंबई : आमदार रवी राणा (Ravi Rana) यांनी केलेले आरोप माझ्या एकटयाला नाही तर सगळय़ांनाच लागू होतात, असे सांगत बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी खोक्यांवरून सुरू असलेल्या वादात आता इतरांनाही ओढले असल्याचं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी सामना मुखपत्रातून म्हटलं आहे. तसेच यावेळी त्यांनी सडकून टीका देखील केली आहे.
यादरम्यान, महाविकास आघाडीत फूट पाडून सत्तेत आलेल्या ईडी सरकारच्या नेत्यांकडून ‘शिंदे आणि फडणवीस हा फेविकॉलचा मजबूत जोड आहे. तो तुटणार नाही,’ असा दावा केला जात होता. मात्र ईडी सरकारला साथ देणारे अपक्ष आमदार बच्चू कडू आणि रवी राणा यांनीच ऐन दिवाळीत ‘पन्नास खोके, एकदम ओके’ या आरोपावरून वात पेटवली आहे. तर दुसरीकडे शिंदे गटाचे आमदार चिमणराव पाटील आणि पाणीपुरवठामंत्री गुलाबराव पाटील यांनी एकमेकांच्या विरोधात फटाके फोडण्यास सुरुवात केली आहे. सत्ताधारी आमदारांकडूनच सत्तेच्या खोक्यांना भोकं पडायला लागल्याने शिंदे गट आणि भाजपच्या गोटात कमालीची अस्वस्थता वाढली आहे, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.
आतापर्यंत विरोधकांकडून शिंदे गटावर 50 खोक्यांचा आरोप होत होता. पण आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या अत्यंत जवळचे आमदार रवी राणांनी हा आरोप केलाय. त्यामुळे भाजप समर्थक रवी राणा आणि शिंदे गटातील अपक्ष आमदार बच्चू कडू यांच्यात शाब्दिक वाद पेटला आहे. आरोप सिद्ध करा अन्यथा आम्हाला वेगळा विचार करावा लागेल, असा निर्वाणीचा इशारा कडू यांनी दिला आहे. आपल्यासोबत सात ते आठ अपक्ष आमदार असल्याचा दावाही त्यांनी केला असल्याचं देखील सांगण्यात आलं आहे.
दरम्यान, जळगावात शिंदे गटाच्या आमदारांना निधी न देता पालकमंत्री गुलाबराव पाटील विरोधी पक्षात असलेल्या राष्ट्रवादीच्या नेत्यांना निधी देत असल्याचा चिमणराव पाटील यांचा आरोप आहे. मतदारसंघात होणारे हस्तक्षेप, निधीवाटप, मंजूर कामांना विलंब, जाणीवपूर्वक राजकीय काटा काढणे, मंत्रिमंडळ विस्तारात इतर कोणाला संधी मिळू नये यासाठी राजकीय डावपेच असे प्रकार खान्देशात सुरू आहेत. यामुळे मंत्री गुलाबराव पाटील यांच्या विरोधात चिमणराव यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे तक्रार केल्याने आगामी काळात जळगाव जिल्ह्यात शिंदे गटात सुरू असलेला वाद अधिक वाढण्याची शक्यता आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
महत्वाच्या बातम्या :
- Uday Samant | “आज आदित्य ठाकरे मंत्र्यांचे राजीनामा मागत आहेत मात्र…”, उदय सामंतांनी दिलं प्रत्युत्तर
- Gulabrao Patil | “आई जगदंबे, जो जो आम्हाला आडवा येईल, त्याचा…”, भरसभेत गुलाबराव पाटील संतापले
- Uday Samant । “टाटा एअरबस प्रकल्पासाठी गेल्या सरकारने काय केलं, कागदपत्रांसह पुरावा द्या”; उदय सामंतांचं आव्हान
- Abdul Sattar । “दोन दिवसात राजीनामा देतो, एकदाचा खेळ…”; आदित्य ठाकरेंच्या वक्तव्यावर अब्दुल सत्तार आक्रमक
- Eknath Shinde | “माझ्यासोबत आलेले सर्व आमदार…”, एकनाथ शिंदेंनी खोक्यांबाबत दिलं स्पष्टीकरण
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.