Uddhav Thackeray | “गद्दारांना आणि त्यांच्या राजकीय बापांना…”; उद्धव ठाकरेंचा विरोधकांवर जोरदार हल्लाबोल

Uddhav Thackeray | मुंबई : मुंबईतील आंबेडकर भवनात प्रकाश आंबेडकर आणि उद्धव ठाकरे यांची संयुक्त पत्रकार परिषद झाली.  शिवसेना (ठाकरे गट) आणि वंचित बहुजन आघाडी यांच्यातील युतीची घोषणा आज पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी केली. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी माध्यमांशी बोलताना विरोधकांवर हल्लाबोल चढवला आहे.

ते म्हणाले, “आम्हाला गृहित धरून अडीच-तीन वर्षे राजकारण केलं गेलं. शिवसेना काँग्रेससोबत जाऊ शकत नाही. शिवसेना राष्ट्रवादीसोबत जाऊ शकत नाही. मला हे पण सांगितलं होतं की शरद पवार कसे फसवतात हा लौकिक तुम्हाला ठाऊक आहे. मी त्यांच्याकडे बघत राहिलो आणि माझ्याच लोकांनी मला दगा दिला.”

“जे राजकारण असं चाललं आहे की दुसऱ्याचं घर फोडून स्वतःचं घर सजवणारी अवलाद सत्तेवर येऊ पाहते आहे ती गाडून टाकण्याची गरज आहे”, असं वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. त्याचबरोबर त्यांनी शिंदे-फडणवीस सरकारला पुन्हा निवडणूका घेण्याचं आव्हान देखील दिलं आहे.

“आजही माझं गद्दारांना आणि त्यांच्या राजकीय बापांना हेच सांगणं आहे की लवकरात लवकर निवडणुका घ्या. महाविकास आघाडीमध्ये वंचित बहुजन आघाडीला स्थान असणार आहे. कुणाच्या कुठल्या जागा? हे आमचं ठरायचं आहे. मात्र आमच्यात सामंज्यस आहे आम्ही त्या प्रमाणे योग्य निर्णय घेऊ”, असं ते म्हणाले.

महत्वाच्या बातम्या :

You might also like

Comments are closed.