Uddhav Thackeray | जिल्हाप्रमुखांच्या बैठकीआधी ठाकरे गटाला मोठा झटका! जिल्हाप्रमुखांचा ठाकरे गटाला रामराम

Uddhav Thackeray | पुणे: महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाच्या निकालानंतर ठाकरे गट ॲक्शन मोडमध्ये आल्याचे दिसून आले आहे. ठाकरे गटाकडून पक्ष वाढीसाठी हालचाली सुरू झाल्या असल्याच्या दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी जिल्हाप्रमुख आणि संपर्कप्रमुखांची बैठक बोलावली आहे. या बैठकीआधी ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. पुणे जिल्ह्याच्या जिल्हाप्रमुखांनी ठाकरे गटाला रामराम करत शिंदे गटात प्रवेश केला आहे.

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सर्व जिल्हाप्रमुख आणि संपर्कप्रमुखांची बैठक बोलावली आहे. या बैठकीमध्ये विविध मुद्द्यावर चर्चा करण्यात येणार आहे. महाविकास आघाडीच्या बैठकीनंतर ठाकरे गटाने ही बैठक बोलावली आहे. या बैठकीपूर्वीच पुणे जिल्हा  ठाकरे गटाच्या जिल्हा प्रमुखांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे आणि शिंदे गटात प्रवेश केला आहे.

ठाकरे गटाचे पुणे जिल्हा प्रमुख महेश पालसकर यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हजेरीत हा पक्षप्रवेश पार पडला. मुंबईमध्ये पुणे जिल्हा प्रमुख महेश पालसकर यांनी शिंदे गटात प्रवेश केला.

दरम्यान, आज दुपारी 12 वाजता शिवसेना भवनात उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये राज्यातील सर्व जिल्हा संपर्कप्रमुख आणि जिल्हाप्रमुखांची बैठक पार पडणार आहे. या बैठकीमध्ये पुढील निवडणुकांची योजना आखली जाणार आहे. विधानसभा, लोकसभा आणि महानगरपालिकेच्या निवडणुकांची रणनीती या बैठकीमध्ये ठरवण्यात येणार आहे.

महत्वाच्या बातम्या

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.