Uddhav Thackeray | “ज्यांचं आयुष्य बारमध्ये गेलं त्यांना…”; आशिष शेलारांच्या ‘त्या’ वक्तव्यावर ठाकरे गटाचा पलटवार

Uddhav Thackeray | कोल्हापूर : उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या ९७ व्या जयंती निमित्त केलेल्या भाषणावर भाजप नेते आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी टीका केली. उद्धव ठाकरे यांनी केलेले भाषण म्हणजे केवळ आदळ-आपट, थयथयाट आणि नृत्य असल्याचे म्हणत त्यांनी उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र सोडले. यावर ठाकरे गटाचे नेते संजय पवार (Sanjay Pawar) यांनी आशिष शेलार यांच्या टीकेला उत्तर दिलं आहे.

“ज्यांचं आयुष्य बारमध्ये गेलं त्यांनाच आमचा कालचा मेळावा नाच गाणं वाटत असावा”, असं संजय पवार म्हणालेत. निवडणुका लावा कोणाचा नाच होतो कळेल, असा इशाराही त्यांनी दिलाय. बाळासाहेब ठाकरे हा आमच्यासाठी भावनिक विषय आहे. म्हणूनच उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना स्वतःचा बाप लक्षात ठेवायला सांगितलं आहे, असं संजय पवार यावेळी बोलताना म्हणालेत.

काय म्हणाले होते आशिष शेलार?

ते म्हणाले, “उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या पक्षाने केलेला वैचारीक स्वैराचार इतिहासात नोंदवला जाईल, असा आहे. त्यामुळे वैचारीक स्वैराचारचे कृत्य म्हणजे उद्धव ठाकरेंच राजकीय जीवन आहे. मला व्यक्तीगत टीका करायची नव्हती. मात्र, त्यांनी काल आमचे बापजादे काढले, म्हणून आज बोलावं लागतं आहे. उद्धव ठाकरे एक अपयशी नेता आहेत. उद्धव ठाकरेंचे चुलत बंधू त्यांच्यापासून दूर झाले. त्यांच्या पक्षातील नेत्यांनी सुद्धा त्यांना नाकारलं. त्यामुळे कौटुंबिक आणि राजकीय पातळीवर ते अपयशी ठरले आहेत. अशा अपयशी व्यक्तीच्या बोलण्याला किती महत्त्व द्यायचं, याचा विचार करायला हवा.”

महत्वाच्या बातम्या :

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.