Uddhav Thackeray | ठाकरे गटाच्या आजच्या मोर्चाला उद्धव ठाकरे उपस्थित राहणार?

Uddhav Thackeray | मुंबई: आज (1 जुलै) उद्धव ठाकरे गटाकडून धडक मोर्चा काढण्यात येणार आहे. ऊन असो किंवा पाऊस असो मोर्चा निघणारच असं, म्हणत आज उद्धव ठाकरे गट मुंबई महानगरपालिकेकडे जाणार आहे. या मोर्चाचं नेतृत्व आमदार आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) करणार आहे. त्यामुळे या मोर्चाला उद्धव ठाकरे उपस्थित राहणार का? असा सवाल उपस्थित झाला आहे.

Uddhav Thackeray had made serious allegations against the Shinde-Fadnavis government

ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर गंभीर आरोप केले होते. मुंबई शहरामध्ये विकास कामाच्या नावानं फक्त उधळपट्टी सुरू असल्याचं उद्धव ठाकरेंनी म्हटलं होतं. त्याचबरोबर पावसाप्रमाणे निवडणुका दिवसेंदिवस लांबच चालल्या असल्याचा गंभीर आरोप देखील त्यांनी सरकारवर केला होता. याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाकडून हा मोर्चा काढण्यात येत आहे.

आदित्य ठाकरे यांच्या या धडक मोर्चाला (Uddhav Thackeray) शिंदे-फडणवीस सरकारकडून सडेतोड उत्तर दिलं जाणार आहे. ‘चोर मचाये शोर’ म्हणतं भाजप, शिवसेना (शिंदे गट) आणि आरपीआय महायुतीकडून मोर्चा काढण्यात येणार आहे. हा मोर्चा आज दुपारी 04 वाजता सुरू होणार आहे. नरिमन पॉईंट येथून हा मोर्चा काढला जाणार आहे.

दरम्यान, आदित्य ठाकरे यांचा मोर्चा मरीन लाईन्सपासून ते मुंबई महानगरपालिका मुख्यालयापर्यंत निघणार आहे. या मोर्चाच्या माध्यमातूनच शिंदे गट आणि ठाकरे गट (Uddhav Thackeray) पुन्हा एकदा आमने-सामने येणार आहे. या मोर्चामुळे राज्यातील राजकारणात नवा वाद निर्माण होण्याची शक्यता झाली आहे.

महत्वाच्या बातम्या

Original NEWS SOURCE – https://bit.ly/43d26jv

You might also like

Comments are closed.