Uddhav Thackeray | ठाकरे गटाला मोठा दिलासा! मशाल चिन्हावर दावा करणारी समता पार्टीची याचिका फेटाळली

Uddhav Thackeray | नवी दिल्ली : निवडणूक आयोगाने पोट निवडणूकीसाठी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गटाला स्वतंत्र चिन्ह (मशाल) आणि नावं (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे) दिलं. परंतू  1994 सालापासून मशाल हे आमच्या पक्षाचे चिन्ह आहे, असा दावा दिवंगत नेते जॉर्ज फर्नांडिस यांच्या समता पार्टीने आयोगाने दिलेल्या ‘मशाल’ चिन्हावर केला. यासंदर्भात समता पार्टीने याचिका देखील दाखल केली. मात्र ही याचिका फेटाळण्यात आली होती.

याचिका फेटाळल्याने उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गटाला दिलासा मिळाला होता. परंतु पुन्हा एकदा समता पार्टीच्या वतीने चिन्हाबाबत याचिका दाखल केली गेली. मात्र यावेळेस देखील समता पार्टीला दुसऱ्यांदा धक्का देत हायकोर्टाने ही याचिका फेटाळली आहे. आता दिल्ली हायकोर्टाच्या याचिकेविरोधात समता पार्टी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याची माहिती समता पार्टीचे अध्यक्ष उदय मंडल यांनी दिली आहे.

ठाकरे गट आणि शिंदे गट दोघांनीही शिवसेना हे पक्षाचं नाव आणि धणुष्यबाण या चिन्हावर दावा केल्यानं निवडणूक आयोगाकडून शिवसेना नाव आणि धणुष्यबाण हे चिन्ह गोठवण्यात आलं. त्यानंतर ठाकरे गटाला निवडणूक आयोगाकडून अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीसाठी मशाल हे चिन्ह मिळालं. मात्र या चिन्हावर समता पार्टीने देखील दावा केल्यानं ठाकरे गटाच्या अडचणी वाढल्या होत्या. अखेर समता पार्टीने या प्रकरणात दिल्ली हायकोर्टात दाखल केलेली याचिका फेटाळण्यात आली आहे. यामुळे ठाकरे गटाला दिलासा मिळाला आहे.

समता पक्षाचा दावा –

ECI ने शिवसेना – उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाला मशाल चिन्ह मंजूर केले आहे. परंतु मशाल हे चिन्ह 2004 मध्ये निवडणूक आयोगाकडे समता पक्षाचे नोंदणीकृत चिन्ह आहे. आमचा पक्ष 1994 पासून राष्ट्रीयीकृत पक्ष आहे आणि आमची जनमानसात चांगली प्रतिष्ठा आहे. तरी तुम्हाला विनंती आहे की शिवसेनेला मशाल व्यतिरिक्त कोणतेही चिन्ह द्यावे, असे समता पक्षाने म्हटलं होतं.

महत्वाच्या बातम्या:

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.