Uddhav Thackeray | ठाकरे-शिंदे पुन्हा येणार आमने-सामने! एकनाथ शिंदेंच्या बालेकिल्ल्यात उद्धव ठाकरेंचा मेळावा
Uddhav Thackeray | ठाणे: आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व पक्ष तयारीला लागले आहे. निवडणुका लक्षात घेत सर्व पक्ष मेळावे आणि बैठका घेत आहेत. याच पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यात म्हणजेच ठाण्यामध्ये मेळावा घेणार आहेत. उद्धव ठाकरेंच्या या मेळाव्याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून राहणार आहे.
A gathering of North Indians has been organized by the Thackeray group
ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे ठाकरे गटाकडून उत्तर भारतीयांच्या मेळाव्याचं आयोजन करण्यात आले आहे. ठाकरे गट या मेळाव्याच्या माध्यमातून मराठी मतदारांसोबतच उत्तर भारतीय मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करणार आहे. ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे स्वतः या मेळाव्याला संबोधित करणार आहे.
दरम्यान, ठाकरे गटानं 16 आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय लवकरात लवकर व्हावा यासाठी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. ठाकरे गटाच्या या याचिकेवर आज (14 जुलै) सुनावणी होणार आहे. सुप्रीम कोर्ट विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना काय आदेश देतील? याकडं सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.
गेल्या काही दिवसांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाने शिंदे गटातील 16 आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय घेण्याचा अधिकार विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर सोपवला होता.
मात्र, कोर्टाने त्यांना हा निर्णय घेण्यासाठी कोणत्याही प्रकारची वेळ ठरवून दिली नव्हती. त्यामुळे नार्वेकरांनी लवकरात लवकर निर्णय घ्यावा अशी मागणी ठाकरे गटाकडून करण्यात आली होती.
महत्वाच्या बातम्या
- Rohit Pawar | महिलांची सुरक्षा करता येत नसेल तर सरकारला क्षणभरही सत्तेत राहण्याचा अधिकार नाही – रोहित पवार
- Sanjay Raut | काल ठाण्यात दोन हास्यजत्रेचे शो पाहायला मिळाले; शिंदे-फडणवीसांच्या बैठकीवर संजय राऊतांची प्रतिक्रिया
- Rahul Narwekar | 16 आमदारांच्या अपात्रतेच्या निर्णय प्रक्रियेला गती! न्यायालय आज नार्वेकरांना काय आदेश देणार?
- Devendra Fadnavis | शिंदे गटात नाराजी? शिंदेंच्या बैठकीत रात्री उशिरा देवेंद्र फडणवीसांची हजेरी
- Ajit Pawar | अखेर मुहूर्त लागला! पुढील 24 तासात अजित पवार गटाला होणार खातेवाटप
Original NEWS SOURCE – https://bit.ly/43kzYeA
Comments are closed.