Uddhav Thackeray | डबल इंजिनमधलं एक पोकळ इंजिन बाजूला जाणार; उद्धव ठाकरेंचा शिंदे-फडणवीस सरकारवर घणाघात

Uddhav Thackeray | मुंबई: राज्यातील सत्ता संघर्षाचा निकाल सुप्रीम कोर्टाने विधानसभा अध्यक्षांकडे सोपवला आहे. या निर्णयानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिलासा मिळालेला असून उद्धव ठाकरे यांच्या चिंतेत भर पडली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर उद्धव ठाकरेंनी प्रतिक्रिया देत शिंदे सरकारवर टीकास्त्र चालवलं आहे.

शिंदे-फडणवीस सरकारवर टीका करत उद्धव ठाकरे म्हणाले, “डबल इंजिन मधलं पोकळ इंजिन बाजूला जाणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी नैतिकतेच्या आधारावर राजीनामा द्यावा आणि निवडणूक लढवण्यासाठी मैदानात यावं.”

महाराष्ट्रातील सत्ता संघर्ष सुरू असताना राज्यपालांच्या भूमिकेबद्दल मत व्यक्त करत उद्धव ठाकरे म्हणाले, “सत्ता संघर्ष सुरू असताना राज्यपालांची भूमिका अत्यंत घृणास्पद होती. निवडणूक आयुक्त निवडण्याची एक प्रक्रिया असली पाहिजे असं मी मत व्यक्त केलं होतं. सुदैवाने त्याच वेळी सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला आणि निवडणूक आयुक्त निवडताना त्यात कोण असले पाहिजे याबद्दल नियमावली जारी केली. राज्यपाल या पदाचा दुरुपयोग केला जात आहे ते पद बरखास्त केलं पाहिजे.”

पूर्वीसारखीच ही यंत्रणा खरी आणि आदरपूर्वक असायला हवी. मात्र, हव्याच्या पायी याची बरबादी करून टाकली आहे. त्यामुळे राज्यपाल नियुक्तीवर काही नियमावली येत नाही तोपर्यंत सरळ राज्यपाल पद रद्द करून टाकावं”, असं मत उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केलं आहे.

महत्वाच्या बातम्या

You might also like