Uddhav Thackeray | “…तर आपणही यांच्यासारखे मंत्री बनून शाब्दीक भीक मागत असतो”; उद्धव ठाकरेंनी चंद्रकांत पाटलांना सुनावलं 

Uddhav Thackeray | मुंबई : राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याने  मुंबईत महाविकास आघाडीच्या वतीने महामोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी आयोजित सभेत बोलताना माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्याचा खरपूस समाचार घेतला आहे.

‘“छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करण्यात आली. फुले दाम्पत्य नसते, तर आपण कोठे असतो, हे एका मंत्र्याने भीक शब्द वापरून दाखवून दिलं आहे,” असे उद्धव ठाकरेंनी सांगितलं.

पुढे ते म्हणाले, “तेव्हा महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना शेणमार आणि धोंडमार सहन करावी लागली, पण ते डगमगले नाहीत. मी माझ्या लोकांना शिकवणार असा निर्धार त्यांनी केला. त्या शिकल्या नसत्या तर आपण शाळेत गेलो नसतो आणि आपणही यांच्यासारखे मंत्री बनून अशी शाब्दीक भीक मागत असलो असतो. हे वैचारिक दारिद्र्य आहे.”

चंद्रकांत पाटलांचं वक्तव्य काय?

पैठणमधल्या एका कार्यक्रमात बोलताना चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं होतं की, “कर्मवीर भाऊराव पाटील यांनी शाळा सुरु केल्या. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा जोतिराव फुले यांनीही शाळा सुरु केल्या. त्यांनी शाळा सुरु करताना सरकारने अनुदान दिलं नाही. तर, त्यांनी लोकांकडे भीक मागितली, शाळा चालवतोय, पैसे द्या. तेव्हाच्या काळात १० रुपये देणारे लोकं होती. आता १०-१० कोटी रुपये देणारे लोक आहेत.”

महत्वाच्या बातम्या :

You might also like

Comments are closed.