Uddhav Thackeray | “तो एक अब्दुल ‘गटार’….” ; उद्धव ठाकरेंची सत्तारांवर खोचक टीका
Uddhav Thackeray | बुलढाणा : बुलढाण्यातील चिखली येथे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गटाच्या वतीने शेतकरी संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात बोलताना उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. त्यांनी अब्दुल सत्तारांच्या सुप्रिया सुळेंबाबत केलेल्या वक्तव्याचा समाचार घेत चांगलंच सुनावलं आहे.
अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी सुप्रिया सुळे यांच्याबाबत वादग्रस्त विधान केलं होत. यावरून उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकारला खोचक सवाल केला आहे. “मी मुख्यमंत्री असताना महिलांचा अपमान करणार्यांना हाकलल होतं. तुम्हीं काय केलत?” असा सवाल त्यांनी केलाय. यावेळी त्यांनी अब्दुल सत्तारांचा उल्लेख अब्दुल गटार असा केलाय.
ते म्हणाले, “काही जण ४० रेडे घेऊन गुवाहटीला गेले आहेत. हे रेडे मी म्हटलेलं नाही. त्यांच्याच मंत्रिमंडळातील एका मंत्र्याने आमचे ४० रेडे तिकडे गेल्याचं म्हटलं होतं. मी मुख्यमंत्री झाल्यावर शिवतीर्थावरच शपथ घेतली आणि पहिल्यांदा आमची कुलस्वामिनी एकविरा आईच्या दर्शनला गेलो. त्यानंतर मी अयोध्येला गेलो होतो.”
पुढे ते म्हणतात, “गेल्या आठवड्यात स्वतःचा हात दाखवायला गेले होते. म्हणजे ज्याला स्वतःचं भविष्य माहिती नाही तो आपलं भविष्य ठरवणार आहे. त्यांची हातसफाई आम्ही आणि संपूर्ण महाराष्ट्राने पाहिली आहे. त्यांचं भविष्य कुडमुड्या ज्योतिषाला विचारून उपयोग नाही. त्यांचं भविष्य ठरवणारे दिल्लीत बसले आहेत. तेच तुमचे मायबाप आहेत. त्यांनी उठ म्हटलं की उठायचं, बस म्हटलं की बसायचं,” असं म्हणत उद्धव ठाकरेंनी शिंदेगटावर बोचरी टीका केलीय.
महत्वाच्या बातम्या :
- Vikram Gokhale | ‘हा’ ठरला विक्रम गोखले यांचा शेवटचा चित्रपट
- Raj Thackeray | “विक्रम गोखले यांची तिन्ही माध्यमांवर एकसारखी हुकूमत हे कमालच…” ; राज ठाकरे यांची फेसबूक पोस्ट
- Vikram Gokhale | असा नट होणे नाही ; राजकीय आणि कलाविश्वातून विक्रम गोखलेंना श्रद्धांजली
- Devendra Fadanvis | “अभिनयाचे चालते-बोलते विद्यापीठ हरपले”; देवेंद्र फडणवीसांनी वाहिली विक्रम गोखले यांना श्रद्धांजली
- Neelam Gorhe | “रामदेव बाबांचं वक्तव्य योग परंपरेला लांच्छन आणणारं”; नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केला संताप
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.