Uddhav Thackeray | “दिल्लीतील बैठकीत महाराष्ट्राच्या जखमेवर फक्त मीठ चोळलं गेलं”; उद्धव ठाकरेंचं सूचक वक्तव्य 

Uddhav Thackeray | मुंबई : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र कर्नाटक सीमावादामुळे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापलेले आहे. विरोधक सत्ताधाऱ्यांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीयेत. या पार्श्वभूमीवर काल केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई (basavraj Bommai) यांची विशेष बैठक बोलावली होती. यावर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी टीका केली आहे. 

महाविकासाघाडीने (MVA) आज मोर्चाच्या निमित्ताने पत्रकार परिषद घेतली. महापुरुषांचा अपमान, बेळगाव सीमा प्रश्न आणि राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हटवण्याची मागणी या मुद्द्यांवर मुंबईत हा मोर्चा निघणार आहे. दरम्यान, काल झालेल्या बैठकीत काहीच साध्य झालं नसल्याचं उद्धव ठाकरे यांनी म्हंटल आहे.

ते म्हणाले, “दिल्लीत जी बैठक झाली. त्यामध्ये कर्नाटक आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. हा प्रश्न चिघळला जातोय. पण ट्विटबाबत खुलासा करायचा इतके दिवस का लागले. पोलीस कारवाई झाली. महाराष्ट्रातल्या वाहनांना बंदी घातली होती. मुख्यमंत्री कार्यालयाने जागृत असायला हवं. की आपल्या ट्विटरवरुन कोण बोलत आहे. बैठकीत फक्त मीठ चोळलं गेलं आहे. मुख्यमंत्री -उपमुख्यमंत्री फक्त हो ला हो म्हणून आले आहेत.”

दरम्यान, पत्रकार परिषदेत बोलताना अजित पवार यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांना टोला हाणला आहे. “ट्विटर हॅक झालं आणि २० दिवसांनी समजलं, असं कुठं असतं का?”, असा मिश्किल सवाल अजित पवार यांनी केला आहे. तुमचं ट्विटर हॅक झालं तेव्हाच तुम्ही तक्रार का केली नाही?, असंही अजित पवार म्हणले.

महत्वाच्या बातम्या :

You might also like

Comments are closed.